Wednesday, September 23, 2009

न्यायसहाय्यक शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेश मुदतीत वाढPrintE-mail
मुंबई, २२ सप्टेंबर/प्रतिनिधी
राज्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेतील प्रवेशाची मुदत वाढविण्याचा निर्णय आज घेण्यात आला. न्यायसहाय्यक म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची येत्या शुक्रवापर्यंत म्हणजे २५ सप्टेंबपर्यंत पुढे नेण्यात आल्याचे संस्थेच्या प्रमुख सल्लागार डॉ. रुक्मिणी कृष्णमूर्ती यांनी कळविले आहे. या शैक्षणिक वर्षांपासून इन्स्टिटय़ुट ऑफ सायन्सेसच्या मुंबई आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी न्यायसहाय्यक विज्ञानातील पदवी, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांसाठी मुंबईत १७० तर औरंगाबादमध्ये ५०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तसेच या अभ्यासक्रमाला मुंबई विद्यापीठाने मान्यता दिली असल्याचेही डॉ. कृष्णमूर्ती यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस, मुंबई आणि औरंगाबाद येथे संपर्क साधावा.

    2 comments:

    1. what are the address of those institue ?

      ReplyDelete
    2. what are address of those institue and in which month the course will be started?

      ReplyDelete