| ‘टेक्सटाईल’मधील करिअर | ![]() | ![]() |
मी बारावीमध्ये शिकत असून मला ‘टेक्सटाईल’मधील करिअर्सबद्दल माहिती द्या- अभिषेक डिंगडणकर वस्त्राचा उपयोग शरीराचं संरक्षण करणं, शरीर झाकणं असं असलं, तरी आज ते कालबाह्य़ झालं आहे. जर आज कोणी विचारले वस्त्राचा उपयोग काय? तर आज या प्रश्नाचं उत्तर शरीर सजवणं हेच आहे. या हौसेखातर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोबतीने वस्त्रोद्योगाचा व्याप खूपच वाढलेला आहे. त्याला महाकाय स्वरूप जगभरच प्रश्नप्त झालं आहे. भारत या व्यवसायात पूर्वीपासूनच आघाडीवर आहे. आजही देशाच्या नियतीमध्ये वस्त्रोद्योगाचा वाटा १६ टक्के आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती देण्याचं काम वस्त्रोद्योगाने निश्चितच केलं आहे. आज सुमारे लाखो लोक या उद्योगात प्रत्यक्ष काम करत आहेत. यामध्ये हाताने सूत तयार करणाऱ्या, विणकाम करणाऱ्या उद्योगाचा समावेश आहे. त्याप्रमाणे मोठमोठय़ा कापड गिरण्यांचाही समावेश आहे. इचलकरंजी, भिवंडी यांसारख्या शहरातील विद्युतमाग तसंच होजिअरी, निटिंग या क्षेत्राचं महत्त्वदेखील वस्त्रोद्योगात मोठं आहे. नैसर्गिक सूत, मानवनिर्मित फायबर, यार्न, लोकरी वस्त्र, रेशीम, हातमाग, कापड गिरण्या, वस्त्र निर्यात अशा वेगवेगळ्या शाखा वस्त्रोद्योगात आपापलं काम करत असतात. वेगवेगळ्या वस्त्रांनी आपली काया सजवत असतानाच आपल्याला या उद्योगात आपला रोजगार आणि करियर या दोन्ही गोष्टी सापडू शकतात. वस्त्रनिर्मिती- तंतूपासून धागा (यार्न) तयार करणं व धाग्यापासून वस्त्र विणणं अशा मोजक्या शब्दांमध्ये वस्त्रनिर्मितीच्या प्रक्रियेचं वर्णन करता येईल. मात्र प्रत्यक्षात अनेक प्रक्रियांचा समावेश वस्त्रनिर्मितीमध्ये केला जातो. वस्त्र तयार करण्यासाठी नैसर्गिक तंतू अथवा मानवनिर्मित तंतूचा वापर केला जातो. नैसर्गिक तंतूमध्ये कापूस, ताग, लोकर, रेशीम, बांबू, सोया इ. तंतूचा (फायबर) समावेश होतो तर मानवनिर्मित तंतूमध्ये पॉलिएस्टर, नायलॉन, अॅक्रॅलिक, सिन्थेटिक फायबर यांचा समावेश होतो. वस्त्रोद्योग (टेक्स्टाईल) तंत्रज्ञानामध्ये प्रश्नमुख्याने स्पिनिंग टेक्नॉलॉजी व विव्हिंग टेक्नॉलॉजी असे दोन प्रकार आहेत. तंतूपासून (फायबर) धाग्याची (यार्न) निर्मिती करणं याला स्पिनिंग टेक्नॉलॉजी म्हणतात. तर यार्नपासून विणलेलं कापड तयार करण्याच्या तंत्रज्ञानाला, विव्हिंग टेक्नॉलॉजी म्हणतात. या व्यतिरिक्त निटिंग टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये निटेड यार्नपासून निटेड फॅब्रिक्स बनवण्याचं तंत्रज्ञान समाविष्ट आहे. नॉन वोव्हन फॅब्रिक्सचीसुद्धा मोठय़ा प्रमाणावर निर्मिती केली जाते. टेक्सटाइल केमिस्ट्रीचा उपयोग कच्च्या मालावर व कपडय़ावर प्रक्रिया करण्यासाठी होतो. रासायनिक प्रक्रियांचा वापर करून आवश्यकतेनुसार ब्लिचिंग, डाईंग, प्रिंटिंग, फिनिशिंग इत्यादी प्रक्रिया कापडावर करण्यात येतात. वस्त्राचा वाढता पसारा- आज वस्त्रनिर्मिती या क्षेत्राची व्याप्ती केवळ विविध पोशाखांपुरती न राहाता अन्य अनेक गोष्टींसाठी कापडाचा उपयोग व्हायला लागला आहे. एरोस्पेस इंजिनीयरिंगमध्ये, पॅराशूट फॅब्रिक्स, ग्लायडर फॅब्रिक्समध्ये कापडाचा वापर होतो. ० ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये टायर कॉर्ड, सीटबेल्ट व इंटेरियरमध्ये कापडाचा वापर होतो. ० फ्लोअर व वॉल कव्हरिंग, बेडिंग्ज, टारपोलिन्स, किल्टर्स यांसारख्या बांधकाम, इंटिरियर डेकोरेशन व आर्किटेक्चरल कामासाठीदेखील टेक्स्टाईलची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. ० कृषी, वैद्यकीय, केमिकल, क्रीडा, खाणउद्योग, जहाजबांधणी, विद्युत, ध्वनीनियंत्रण, पॅकेजिंग तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, फॅशन डिझायनिंग, अॅपरल मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या उद्योगांमध्ये वस्त्राचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. ० स्मार्ट टेक्स्टाईल, नॅनो टेक्नॉलॉजी, टेक्निकल टेक्स्टाईल, अल्ट्रा सोनिक्स इत्यादी अनेक नवनवीन तंत्रज्ञानामुळे टेक्स्टाइल क्षेत्राचा चेहरामोहरा बदलत आहे. बुलेटप्रूफ, फायरफ्रूफ, इंडस्ट्रियल टेक्स्टाइल, सुपर स्पेशालिटी टेक्स्टाईल यामध्येदेखील आमूलाग्र बदल होत आहेत. रोजगाराच्या संधी- सूतगिरण्या, कापड गिरण्या, वस्त्रव्यवस्थापन कंपन्या, कारखाने यांच्या स्वरूपात व कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. ऑटोमेशन प्रक्रियेमुळे छोटे कार्यक्षम प्रकल्प निर्माण होत आहेत. वस्त्र व्यवस्थापनामध्ये अॅपरल र्मकटायझ्िंाग, मटेरियल सोअर्सिंग, फॅब्रिक को-ऑर्डिनेशन,रटेलिंग, कस्टम क्लियरिंग, ग्राहक सेवा केंद्र, मॉस मॅनेजर, निर्यात सेवा केंद्र यामध्ये रोजगार स्वयंरोजगाराच्या नवीन संधी तयार होत आहेत. वस्त्रनिर्मिती क्षेत्रामध्ये निर्मिती तंत्रज्ञान, प्रक्रिया तंत्रज्ञान, गुणवत्ताचाचणी, गुणवत्ता नियंत्रण आणि हमी, गार्मेट निर्यात केंद्र, सहयोगी निर्मिती केंद्र, विपणन व विक्री केंद्र, संशोधन व विकास केंद्र, रासायनिक प्रक्रिया केंद्र, कारखाने इत्यादीमध्ये रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. फॅशन टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये प्रश्नमुख्याने फॅशन र्मकटायझिंग, फॅशन डिझायनिंग, कॉस्च्युम डिझायनिंग, डिझायनर प्रिंटिंग, फॅशन जर्नालिस्ट, फॅशन कन्सल्टंट इत्यादी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अभ्यासक्रम व संस्था- सस्मिरा- (द सिंथेटिक अॅण्ड आर्ट सिल्क मिल्स रिसर्च असोसिएशन) सस्मिरा ही भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत काम करते. या संस्थेमध्ये टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीमध्ये अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमांच्या बरोबरीने वस्त्रोद्योगाला शास्त्रीय व तांत्रिक मदतदेखील या संस्थेमार्फत केली जाते. या संस्थेद्वारा रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट कार्यक्रमानुसार इको फ्रेंडली प्रश्नेसेसेस्, टाकाऊ गोष्टींचा पुनर्वापर करणं आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन केलं जातं. तसंच सस्मिरा हे टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये नोडल सेंटर म्हणून ओळखलं जातं. या नोडल सेंटरच्या अंतर्गत जिओ टेक्स्टाईल, ऑटोमोटिव्ह टेक्स्टाईल, अॅग्रो टेक्स्टाईल, मेडिकल टेक्स्टाईल, कॉम्पोझिट्स, आर्किटेक्चर अॅण्ड स्ट्रक्चरल टेक्स्टाईल आदी विषयांचा अंतर्भाव होतो. संपर्क : सस्मिरा, सस्मिरा मार्ग,वरळी, मुंबई- ४०००३०. फोन- ०२२- २४९३५३५१, २४९३५३५२ वेबसाईट- www.sasmira.org नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी - या संस्थेमध्येदेखील टेक्स्टाईल डिझायनिंगमधील खालील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पदवी अभ्यासक्रम ० टेक्स्टाईल डिझाइन- निटवेअर डिझाइन बारावीनंतर ४ वर्षे, पदव्युत्तर अभ्यासक्रम. ० फॅशन मॅनेजमेंट- अॅपरल प्रश्नॅडक्शन पदवीनंतर २ वर्षे. संपर्क- एन.आय.एफ.टी. कॅम्पस, प्लॉट नं. १५, सेक्टर- ४. खारघर, नवी मुंबई- ४१०२१०. फोन : ०२२- २७७४७०००/ ७१००/५५/४९ वेबसाइट- www.niftindia.com नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन (अहमदाबाद) पालडी, अहमदाबाद, गुजरात- ३८०००७. फोन- ०७९- २६६२३६९२ वेबसाईट- www.nid.edu या संस्थेमध्ये ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रश्नेग्रॅम इन डिझाइन या अंतर्गत टेक्स्टाईल अॅण्ड अॅपरल डिझाइन हा चार वर्षाचा अभ्यासक्रम (१२ वी नंतर) उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील दहावीनंतरचे डिप्लोमा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्याशी संलग्न टेक्स्टाईल संदर्भात खालील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. साधारणत: दहावीनंतर तीन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे. ० निटिंग टेक्नॉलॉजी ० मॅनमेड फायबर मॅन्युफॅक्चरिंग ० टेक्स्टाइल मॅन्युफॅक्चरिंग (कॉटन) ० मॅनमेड टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी ० गार्मेट टेक्नॉलॉजी ० ड्रेस डिझायनिंग अॅण्ड गार्मेट मॅन्युफॅक्चरिंग ० टेक्स्टाईल इंजिनीयरिंग ० टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी ० टेक्स्टाईल प्लांट इंजिनीयरिंग ० टेक्स्टाईल केमिस्ट्री ० टेक्स्टाईल अॅण्ड अॅनॅलिटिकल केमिस्ट्री या व अन्य अभ्यासक्रमांसाठी www.msbte.org ही वेबसाइट पाहावी. अभ्यासक्रम वस्त्रांनी स्वत:ला सजवण्याची आवड अनेकांना असते, पण वस्त्राला सजवण्याची, खुलवण्याची आवड एका वेगळ्याच विश्वात तुम्हाला घेऊन जाईल. आनंद मापुस्कर फोन : ०२२-३२५०८४८७. दहावीनंतरचे अभ्यासक्रम नाव कालावधी स्वरूप डिप्लोमा इन टेक्स्टाईल केमिकल एक वर्ष अर्धवेळ प्रश्नेसेसिंग टेक्नॉलॉजी सर्टिफिकेट कोर्स इन वेट (wet) एक वर्ष अर्धवेळ प्रश्नेसेसिंग ऑफ मॅनमेड टेक्स्टाईल सर्टिफिकेट कोर्स इन विव्हिंग एक वर्ष अर्धवेळ ऑफ मॅनमेड टेक्स्टाईल डिप्लोमा इन फॅशन अॅण्ड एक वर्ष पूर्ण वेळ अॅपरल डिझाइन टेक्नॉलॉजी डिप्लोमा इन फॅशन डिझाईन एक वर्ष पूर्ण वेळ डिप्लोमा इन टेक्स्टाईल कलर एक वर्ष पूर्ण वेळ अॅण्ड डिझाइन टेक्नॉलॉजी डिप्लोमा इन टेक्स्टाईल डिझायनिंग एक वर्ष पूर्ण वेळ डिप्लोमा इन एम्ब्रॉयडरी टेक्नॉलॉजी अॅण्ड र्मकटायझिंग एक वर्ष पूर्ण वेळ बारावीनंतरचा अभ्यासक्रम डिप्लोमा इन अॅपरल र्मकटायझिंग एक वर्ष पूर्ण वेळ डिप्लोमा इन एक्सपोर्ट -इम्पोर्ट सहा महिने अर्धवेळ मॅनेजमेंट (गारमेंट) डिप्लोमा इन अॅपरल रिटेल मॅनेजमेंट एक वर्ष पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा एक वर्ष अर्धवेळ इन टेक्स्टाईल केमिकल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी (बी.एस्सी. केमिस्ट्री पदवी आवश्यक) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एक वर्ष पूर्ण वेळ अॅपरल र्मकटायझिंग बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर एक महिना अर्धवेळ एडेड टेक्स्टाईल डिझायनिंग अॅडव्हान्स कोर्स इन बेसिक कॉम्प्युटर तीन महिने अर्धवेळ एडेड टेक्स्टाईल डिझायनिंग |


मी बारावीमध्ये शिकत असून मला ‘टेक्सटाईल’मधील करिअर्सबद्दल माहिती द्या
No comments:
Post a Comment