| केमिकल टेक्नॉलॉजीचे ‘रसायन’ | ![]() | ![]() |
बुधवार, २६ ऑगस्ट २००९मी अकरावी विज्ञानशाखेत शिकत असून मला मुंबईमधील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधील अभ्यासक्रमांची माहिती द्यावी? - अनघा चव्हाण विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रियांनी आपलं अवघं जीवन वेढलेलं आहे. माणसाचं अंतर्बाह्य़ जीवन हे रसायनशास्त्राने (केमिस्ट्री) व्यापलेलं आहे. दुधापासून दही तयार करणं, कापसापासून सुंदर वस्तू बनवणं, नवनवीन रंग तयार करणं, रोगावर उपचार करण्यासाठी नवनवीन औषधं शोधणं, शेतीसाठी खत तयार करणं, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी घातक पदार्थ, द्रव्य यांचं योग्य पद्धतीने विघटन करणं यासारख्या उदाहरणांवरून केमिकल टेक्नॉलॉजीचं आपल्या जगण्यातलं महत्त्व लक्षात येतं. जवळपास प्रत्येक व्यवसायाचा या ना त्या कारणाने केमिकल टेक्नॉलॉजीशी संबंध येतोच. केमिकल टेक्नॉलॉजी हे केमिस्ट्रीचं उपयोजित (अप्लाईड) शास्त्र आहे. त्याचा विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी उपयोग केला जातो. यामध्ये रासायनिक प्रक्रियेद्वारे कच्च्या मालाचं मूल्यवान उत्पादन बनवणं (क्रूड ऑईलपासून पेट्रोलियम उत्पादन निर्मिती), प्रयोगशाळेतील सफल रासायनिक प्रक्रियेचे रूपांतर मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये करणं या गोष्टी येतात. खतनिर्मिती कारखाने, पॉलिमर्स, पेंट्स, औषधनिर्मिती कंपन्या, अॅग्रोकेमिकल कंपन्या, रिफायनरीज, पेट्रोकेमिकल्स प्लँट्स या सर्व ठिकाणी केमिकल टेक्नॉलॉजिस्टकडे प्रश्नेसेससाठी योग्य रचना, परीक्षण, प्रयोगाची प्रमाणबद्धता, कृती, नियंत्रण तसेच प्रक्रियेचे ऑप्टिमायझेशन करणं इत्यादी गुण आवश्यक ठरतात. याबरोबरीनेच डिस्टिलेशन, मिक्सिंग, बायोलॉजिकल प्रश्नेसेस यासारख्या गोष्टींचा अभ्यास करणं आवश्यक असतं. रसायनशास्त्रातील कौशल्याबरोबरीनेच गणित व संगणकीय कौशल्यदेखील केमिकल टेक्नॉलॉजीत महत्त्वपूर्ण ठरतात. केमिकल टेक्नॉलॉजीमधील काही विशेष शाखांची ओळख करून घेऊ या. फार्मास्युटिकल सायन्सेस (औषधनिर्मिती शास्त्र) : यामध्ये औषधाचं स्वरूप व देण्याची पद्धती, वैद्यकीय रसायनशास्त्र, औषधनिर्मिती शास्त्र, वनौषधी इत्यादी विषयांचा समावेश होतो. बरोबरीनेच ऑरगॅनिक केमिस्ट्री (जैविक रसायनशास्त्र), मायक्रोबायोलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र), बायोकेमिस्ट्री या विषयांचा देखील अंतर्भाव असतो. या विषयातील तज्ज्ञ, औषधनिर्मिती, औषध वापराचा कालावधी ठरवणं, त्या औषधाच्या रिअॅक्शन व त्याची अपायकारकता (toxicity) या गोष्टींकडे लक्ष देतात. डाइज (रंग) : यामध्ये ऑर्गेनिक केमिस्ट्रीचा अभ्यास केला जातो. यामध्ये क्लोरेंट्स (colorants) बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. हे रासायनिक प्रक्रियेद्वारे नैसर्गिक संपत्तीतून तयार केले जातात. सिंथेटिक क्लोरेंट्स अनेक टप्प्यातील सिंथेसिसद्वारे तयार केले जातात. यात ऑर्गेनिक केमिस्ट्रीचा अभ्यास उपयोगी पडतो. याद्वारे तयार केलेले रंग टेक्स्टाइल, अन्नपदार्थ, औषधं व अन्य हायटेक उपयोगासाठी वापरले जातात. याच शाखेतील संशोधनातून लेझर्स व इंकजेट प्रिंटिंग, ऑप्टिकल रेकॉर्डिग उपकरणं त्याचप्रमाणे उच्च दर्जाच्या कामांसाठी लागणाऱ्या रंगद्रव्यांचा अभ्यास केला जातो. फायबर्स व टेक्स्टाइल प्रश्नेसेसिंग टेक्नॉलॉजी : वस्त्रोद्योगाला अनेकांगी प्रगतीने नवी झळाळी प्रश्नप्त झाली आहे. यामध्ये विविध टेक्स्टाइल मटेरियलच्या वेट (wet) प्रश्नेसेसिंग, फायबरपासून फिनिश प्रश्नॅडक्ट देणाऱ्या अद्ययावत टेक्नॉलॉजी, औद्योगिक गरजा, पर्यावरणावरील परिणाम, पॉलिमर सायन्स, स्पेशालिटी केमिकल्स, टेक्निकल टेक्स्टाइल, स्मार्ट टेक्स्टाइल, मार्केटिंग अशा विषयावर काम केलं जातं. नैसर्गिक (कापूस, ताग वगैरे) व मानवनिर्मित तंतूंचा यामध्ये सर्वागाने अभ्यास केला जातो. (उदाहरणार्थ तंतूचे रासायनिक गुणधर्म, त्यांचे संयोग घडवणं, विविध क्षेत्रात त्यांचा उपयोग करण्याच्या दृष्टीने त्यांच्या रचनेचा अभ्यास करणं इत्यादी.) एरोस्पेस सूट, वाहन उद्योगात लागणारे फॅब्रिक्स यासारख्या गोष्टींची विशेष आवश्यकता लक्षात घेऊन फायबरवर करावी लागणारी प्रि-ट्रिटमेंट, रंगकाम, विविध केमिकल प्रक्रिया व टेक्नॉलॉजी यांचा अभ्यास विशेषत्वाने केला जातो. रंगाचा (डाईज व पिंगमेंट) सविस्तर अभ्यास, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग, र्मकटायझिंग, सर्व प्रकारच्या फायबरचं परीक्षण अशा कामांचा या क्षेत्रात समावेश होतो. या क्षेत्रात शिक्षण घेतलेल्यांना टेक्स्टाइल उद्योग, प्रक्रिया उद्योग, गारमेंट व्यवसाय, डायस्टफ तसंच टेस्टिंग हाऊसेसमध्ये प्रश्नॅडक्शन, रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट व मार्केटिंग विभागात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. फूड इंजिनीयरिंग व टेक्नॉलॉजी : आजचा जमाना रेडी टू इट असा इन्स्टंट फूडचा आहे. सध्याच्या युगात फूड इंजिनीयरिंग व टेक्नॉलॉजीच्या शाखेला विशेष महत्त्व प्रश्नप्त झालं आहे. या शाखेत अन्नपदार्थाचा केमिकल, बायोकेमिकल व मायक्रोबायल दृष्टीने अभ्यास केला जातो. उच्च प्रतीचे अन्नपदार्थ बनवणं, त्याचे परीरक्षण (प्रिझव्र्हेशन) करणं व विविध वातावरणात त्यावर काय परिणाम होऊ शकतो. याचा अभ्यास यामध्ये केला जातो. प्रशिक्षणामध्ये अन्नपदार्थ तयार करण्याची प्रक्रिया, उद्योगाची रचना, गुणवत्ता हमी व्यवस्था या गोष्टींचा समावेश केला जातो. प्रक्रिया उद्योगामध्ये उत्पादनाच्या मार्केटिंगचा अभ्यासदेखील या दरम्यान केला जातो. भारतीय खाद्यपदार्थाच्या दृष्टीने काबरेहायड्रेट केमिस्ट्री व टेक्नॉलॉजीचा अभ्यास, अन्नपदार्थाची गुणवत्ता, सुरक्षा या दृष्टीने फूड मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास, नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं अशा महत्त्वपूर्ण गोष्टींचादेखील अभ्यासात समावेश होतो. ऑईल्स, ओलिओकेमिकल्स व सर्फ अॅक्टंट टेक्नॉलॉजी : या शाखेत ऑईल व फॅटस्च्या केमिस्ट्री व टेक्नॉलॉजीचं सखोल ज्ञान दिलं जातं. त्याचप्रमाणे त्याच्या औद्योगिक क्षेत्रातील उपयोगाचा अभ्यासदेखील केला जातो. ऑईल टेक्नॉलॉजिस्टना ऑईल मिल्स, रिफायनरीज, ओलिओकेमिकल्स, सोप व डिर्टजट निर्मिती उद्योग, सर्फ अॅक्टंट, ऑक्सिलरी केमिकल निर्मिती उद्योग अशा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. पॉलिमर इंजिनीयरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी : या शाखेमध्ये क्रूड पेट्रोलियमपासून प्रश्नप्त होणाऱ्या मोनोमर्स, अॅडिटिव्हज् यांसारख्या कच्च्या मालाचा अभ्यास केला जातो. पॉलिमर्सच्या गुणधर्माचा अभ्यास, कलर फिजिक्स, थर्मोप्लॅस्टिक्स टेक्नॉलॉजी, थर्मोसेर मॅन्युफॅक्चरिंग अशा विषयांचा प्रशिक्षणात समावेश असतो. सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी : यामध्ये पेंटस्, वॉर्निश टेक्नॉलॉजी, इंक टेक्नॉलॉजीचा समावेश होतो. त्याप्रमाणे यंत्राच्या भागांची झीज भरून काढण्याच्या दृष्टीने त्यावर करण्याच्या कोटिंगचंही प्रशिक्षण यामध्ये दिलं जातं. केमिकल टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था : इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई काही वर्षापूर्वी यू. डी. सी. टी. म्हणून प्रसिद्ध असलेल्या या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रश्नप्त झाला असून देशामध्ये केमिकल टेक्नॉलॉजीमधील अग्रगण्य संस्था म्हणून या संस्थेने नावलौकिक मिळवला आहे. केमिकल टेक्नॉलॉजीमधील पदवी, पदव्युत्तर व डॉक्टरेट अभ्यासक्रम या संस्थेत उपलब्ध आहेत. पदवी अभ्यासक्रम : ० बी. ई. केमिकल इंजिनीयरिंग ० बी. फार्मसी ० बी. टेक. (डाईज) ० बी. टेक. (टेक्स्टाईल) ० बी. टेक. (फूडस्) ० बी. टेक. (ऑईल्स) ० बी. टेक. (फार्मा) ० बी. टेक. (पॉलिमर) ० बी. टेक. (कोटिंग) यापैकी काही अभ्यासक्रमांना एम. एच. टी.- सी. ई. टी.द्वारे तर काही अभ्यासक्रमांना (बी. फार्मसी वगळता) ए. आय. ई. ई. ई. या परीक्षेद्वारे प्रवेश दिले जातात. पदव्युत्तर अभ्यासक्रम : ० एम. केमिकल इंजिनीयरिंग व एम. टेक. डायस्टफ टेक्नॉलॉजी, फायबर अॅण्ड टेक्स्टाईल, प्रश्नेसेसिंग टेक्नॉलॉजी, फूड इंजिनीयरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, ऑईल, ओलिओकेमिकल्स अॅण्ड सर्फक्टंट टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल सायन्सेस अॅण्ड टेक्नॉलॉजी, पॉलिमर इंजिनीयरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी. एम. फार्मा : ० फार्मास्युटिकल केमिस्ट्री, मेडिसिनल नॅचरल प्रश्नॅडक्टस्, फार्मास्युटिक्स, एम. ई. ० प्लॅस्टिक इंजिनीयरिंग एम. टेक. : ० बायोप्रश्नेसेस टेक्नॉलॉजी, फूड बायोटेक्नॉलॉजी, परफ्युमरी अॅण्ड फ्लेवर टेक्नॉलॉजी पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश हे आय. आय. टी.च्या गेट (GATE) या प्रवेश परीक्षेतील गुणांवरून व संस्थेच्या लेखी परीक्षेतील गुणांनुसार दिले जातात. डॉक्टरल डिग्री कोर्स (पीएच. डी.) : बायोप्रश्नेसेस टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनीयरिंग,. डाईज पीएच. डी. (टेक) इन केमिकल टेक्नॉलॉजी टेक्स्टाईल, पूडस्, ऑईल्स, फार्मा. टेक, फार्मास्युटिकल सायन्स, पॉलिमर, कोटिंग्ज, प्लॅस्टिक इंजिनीयरिंग पीएच. डी. (सायन्स) : बायोटेक्नॉलॉजी, केमिस्ट्री-इन ऑरगॅनिक, ऑरगॅनिक, फिजिकल, फिजिक्स, गणित. संस्थेच्या व अभ्यासक्रमांच्या सविस्तर माहितीसाठी संपर्क : इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा, मुंबई- ४०००१९. दूरध्वनी- ०२२-२४१४५६१६. www.udct.org युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (जळगाव)- संपर्क : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पो. बॉ. नं. ८०, डमविनगर, जळगाव- ४२५००१. दूरध्वनी- ०२५७-२२५७४४१. www.nmu.ac.in या संस्थेत खालील पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रवेश एम. एच. टी.- सी. ई. टी.द्वारे दिले जातात. ० केमिकल इंजिनीयरिंग ० फूड टेक्नॉलॉजी ० ऑईल, फॅटस् अॅण्ड वॉक्स टेक्नॉलॉजी ० पेंटस् टेक्नॉलॉजी ० प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (औरंगाबाद)- संपर्क : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद- ४३१००४ दूरध्वनी- ०२४०-२४०३३०८ या संस्थेत खालील पदवी अभ्यासक्रम उपलब्घ आहेत. ० फूड टेक्नॉलॉजी ० फार्मास्युटिकल अॅण्ड फाईन केमिकल्स प्रवेश एम. एच. टी.- सी. ई. टी.द्वारे दिले जातात. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (अमरावती) संपर्क: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती- ४४४६०२. दूरध्वनी- ०७२१-२६६२३५८. www.sqbau.ac.in या संस्थेत खालील पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ० ऑईल अॅण्ड पेंटस् टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, पेपर अॅण्ड पल्प टेक्नॉलॉजी ० पेट्रो केमिकल टेक्नॉलॉजी प्रवेश एम. एच. टी.- सी. ई. टी.मार्फत दिले जातात. याव्यतिरिक्त अनेक इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये केमिकल इंजिनीयरिंगचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यांच्या माहितीसाठी www.dte.org.in ही वेबसाइट पाहावी. रसायनांची ही दुनिया काहीशी गुंतगुंतीची असली, तरी तितकीच आव्हानात्मक आहे. आपल्या बुद्धीचा कल लावू पाहणाऱ्यांना हे क्षेत्र अनेक वेगवेगळ्या संधी देतं. स्वतंत्र संशोधनासाठी आणि केवळ नोकरदार न राहता स्वतंत्र उद्योग करण्याची इच्छा असल्यास त्यासाठीही वाव देतं. आनंद मापुस्कर |


बुधवार, २६ ऑगस्ट २००९
No comments:
Post a Comment