Sunday, September 6, 2009

हार्डवेअर व नेटवर्किंग एक हमखास करिअर क्षेत्रPrintE-mail
संगणकीय क्रांतीने सबंध जग प्रभावित झालेले आहे. जवळजवळ सर्वच क्षेत्रांचे संगणकीकरण होत आहे. या संगणकीकरणाच्या प्रक्रियेत दोन अगदी महत्त्वाचे घटक आहेत. एक म्हणजे सॉफ्टवेअर आणि दुसरे म्हणजे हार्डवेअर. ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांची पूरक आहेत. ही दोन्ही क्षेत्रे करिअरच्या दृष्टीनेही अगदी महत्त्वाची आहेत. दोन्ही क्षेत्रात आज अगदी हमखास व खात्रीलायक करिअर घडविता येते. मात्र दोन्हीमध्ये तुलनेने सॉफ्टवेअरकडेच तरुणांचा अधिक कल दिसून येतो. मात्र हार्डवेअरशिवाय सॉफ्टवेअर शक्यच नाही. म्हणून हार्डवेअरची व्याप्ती ही करिअरच्या दृष्टीने सॉफ्टवेअरइतकीच, किंबहुना थोडी अधिकच आहे.
हार्डवेअर म्हणजे संगणकीकरणासाठी लागणारा सर्व संगणकीय सेट-अप, त्याची जोडणी, इन्स्टॉलेशन मेंटेन्सन, दुरुस्ती, संगणक जोडणी.. इत्यादी सर्व त्यात आले. हार्डवेअर क्षेत्रात २००४ साली ७७ हजार जॉब्सच्या संधी होत्या. मागील काही वर्षापासून संगणकीकरणाचा वेग वाढत आहे. शिवाय संगणकांच्या विक्रीचा दरही प्रतिवर्षी २३ टक्क्यांनी वाढत आहे. ही वाढ अशीच राहिली तर २०१५ पर्यंत भारतात सात लाख ८० हजार जॉब्स उपलब्ध होतील. आज भारत हा हार्डवेअर सेक्टरसाठी इंटरनॅशनल हब बनतोय. सॉफ्टवेअरपेक्षा या क्षेत्राकडे वळणाऱ्यांची संख्या कमी असली किंवा याबद्दल कमी माहिती असली तरी हे क्षेत्र झपाटय़ाने वाढत आहे. अर्नेस्ट अॅण्ड यंग आणि हार्डवेअर इंडस्ट्री यांनी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन फॉर इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या मदतीने केलेल्या निरीक्षणानुसार २०१० पर्यंत भारतीय हार्डवेअर इंडस्ट्री सहा हजार २०० करोड अमेरिकन डॉलरएवढी वाढेल. यावरून या क्षेत्राला असणारी मागणी लक्षात येते. आंतरराष्ट्रीय स्तरावर हार्डवेअर क्षेत्रात भारताचा वाटा २.२ टक्के एवढा असेल, असा अंदाज आहे.
ही वस्तुस्थिती लक्षात घेता हार्डवेअर क्षेत्रात करिअर करणे हे खात्रीलायक झालेले आहे. या क्षेत्रात हार्डवेअर इंजिनीअर म्हणून काम करायचे तर कॉम्प्युटर इंजिनीअरिंगची पदवी असायला हवी. याशिवाय दोन किंवा तीन वर्षाचे हार्डवेअर कोर्स करूनही हार्डवेअर इंजिनीअर म्हणून काम करता येते. या क्षेत्रात काम करायचं तर पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रश्नत्यक्षिक ज्ञान व परिपूर्ण प्रशिक्षण असायला हवं. एखाद्या कंपनीत नोकरी करण्यासोबतच स्वत:चा बिझिनेस अथवा कन्सल्टन्सी देण्याचा पर्यायही असतो. कॉम्प्युटरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये तर हार्डवेअर इंजिनीअर्सना जॉबच्या हमखास संधी असतात.
त्याचप्रमाणे हार्डवेअर इंजिनीअर्सना अलीकडे नेटवर्किंग किंवा सिस्टीम इंजिनीअर म्हणून काम करावे लागते. हे क्षेत्र म्हणे हार्डवेअर क्षेत्रातील एक स्पेशलायझेशन होय. एखाद्या कंपनीला तिच्या गरजेप्रमाणे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर पुरवण्याचं काम सिस्टीम इंजिनीअरला करावा लागतं. कंपनीची सिस्टीम म्हणजे कॉम्प्युटर किंवा सव्र्हरमध्ये समस्या आल्यास ती सोडवण्याची जबाबदारी यांच्यावरच असते. नेटवर्क इंजिनीअर कंपनीतील दोन किंवा त्याहून अधिक कॉम्प्युटर्स सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जोडून देतात. यामध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनचं काम महत्त्वाचं असतं.
आज प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटरची गरज असल्याने या क्षेत्राला असणारी मागणी वाढतच आहे. इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग ही सर्वसंबंधित क्षेत्र आहेत. त्यामुळे या विषयात बीई डीग्री घेतल्यांना इथे चांगल्या संधी आहेत. मात्र कॉम्प्युटर ग्रॅज्युएटसोबतच इतरही विद्यार्थ्यांना या क्षेत्रात मुबलक संधी आहे. दहावी, बारावी किंवा ग्रॅज्युएशन केलेल्या विद्यार्थ्यांना इथे चांगले करिअर करता येते. फक्त सुरुवातीला पगारात फरक आढळेल. पण आवश्यक तो अनुभव जमा झाल्यावर चांगल्या पदावर आणि पगारावर काम करण्याची संधी मिळते.
या क्षेत्रात विविध प्रकारचे जॉब्स उपलब्ध आहेत. काही महत्त्वपूर्ण जॉब्स पुढीलप्रमाणे आहेत. हार्डवेअर इंजिनीअर्सना मिळणाऱ्या संधी पीसी अॅण्ड कॉम्प्युटर सपोर्ट, नेटवर्किंग प्रश्नेफेशनल्स, कॉम्प्युटर/ चिप डिझायनर, कॉम्प्युटर मॅन्युफॅक्चरर, टेक्निकल सपोर्ट एक्टिक्युटिव्ह, सिस्टीम अॅडमिनिस्टेटर, सिस्टीम स्पेशालिस्ट.
या जॉब्सव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक डेटा प्रश्नेसेसर, बीपीओ, कॉम्प्युटर सपोर्ट सव्र्हिस सेंटर, आयटी मार्केटिंग आदी जॉब्सही करू शकतात. बारावीनंतर इंजिनीअरिंग कोर्सला प्रवेश घेऊन बीई डिग्री पूर्ण करता येईल. कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनीअरिंगमध्ये स्पेशलायझेशन करता येते. बीएस्सी/ एमएस्सी (आयटी) आणि एमसीएसई, सीसीएनए, नेटवर्किंग, लिनक्स सर्टिफिकेशन तुम्हाला या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आवश्यक आहे.
अशा प्रकारे, या क्षेत्रात हमखास करिअरच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. मात्र करिअर कसे करावे? तर साधारणत: या क्षेत्राशी संबंधित ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवून या क्षेत्रात हमखास करिअर करता येते. मात्र ज्यांना ते शक्य नाही ते प्रश्नयव्हेट संस्थेतूनही योग्य कोर्स करून या क्षेत्रात हमखास करिअरसाठी प्रवेश करू शकतात.
मात्र खाजगी संस्थांमध्ये खूपच कमी संस्था विद्यार्थ्यांचे भविष्य व करिअर लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. हार्डवेअर व नेटवर्किंग क्षेत्रातील सर्व व्याप्ती व संधी लक्षात घेऊन कीर्ती हार्डवेअर व नेटवर्किग इन्स्टिटय़ूटने या क्षेत्रासाठी विविध करिअर अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. या संस्थेत संपूर्ण प्रॅक्टिकल्स व अनुभवाची जोड देऊन विद्यार्थ्यांना हमखास करिअर घडविण्यास तयार केले जाते.
या संस्थेत कॉम्प्युटर असेम्बलिंग हार्डवेअर नेटवर्किंग, आधुनिक प्रकारचे सुटे भाग, त्याची दुरुस्ती, विक्री, कॉम्प्युटर मेंन्टेनन्स, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन या विषयाचे परिपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेतर्फे हार्डवेअर आणि नेटवर्किंग क्षेत्रातील आधुनिक माहिती तंत्रज्ञानावरील अत्यावश्यक सर्टिफाईड कोर्सेसही शिकवले जातात. त्यामध्ये सर्टिफाईड सिस्टीम इंजिनीअर, डिप्लोमा इन सिस्टम अॅण्ड नेटवर्क इंजिनीअरिंग, सर्टीफाईड नेटवर्किंग प्रश्नेफेशनल आणि सर्टिफाईड नेटवर्क स्पेशालिस्ट यांसारखे आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम शिकवले जातात. यामध्ये PC Engineering (A+), Networking (N+), MSCE, CCNA, CWNA, Network Management and Operations, Ret Hat Linux System Administration, Network Administration and Security Services या विषयांचे सखोल प्रशिक्षण दिले जाते.
अशा प्रकारे, हार्डवेअर व नेटवर्किंग क्षेत्र हे करिअर करण्यासाठी खात्रीलायक क्षेत्र आहे. मात्र त्यासाठी परिपूर्ण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
हेमंत देशमुख
९८१९१३३२६६

    No comments:

    Post a Comment