Thursday, December 31, 2009
Wednesday, December 30, 2009
Tuesday, December 29, 2009
Monday, December 28, 2009
Saturday, December 26, 2009
Friday, December 25, 2009
Thursday, December 24, 2009
Wednesday, December 23, 2009
Tuesday, December 22, 2009
Sunday, December 20, 2009
Friday, December 18, 2009
Thursday, December 17, 2009
Wednesday, December 16, 2009
Tuesday, December 15, 2009
ORIGINS OF CHEMISTRY IN ANCIENT INDIA
Monday, December 14, 2009
Friday, December 11, 2009
Thursday, December 10, 2009
Wednesday, December 9, 2009
| संशोधन क्षेत्रातील आव्हाने | ![]() | ![]() |
| पुष्कर मुंडले, बुधवार, ०९ डिसेंबर २००९ संपर्क-९९६९४६३६१० संशोधन म्हणजे काय किंवा त्यासाठी किती वर्षे देऊन काय शिकावे लागते? ‘मला संशोधनाची आवड आहे’ म्हणणाऱ्या प्रत्येकाला या प्रश्नावर नेमके उत्तर नाही याची पुरेपूर जाणीव असते.. कोणत्याही नवनिर्माण आणि सृजनासाठी विलक्षण चिकाटी, सातत्यपूर्ण परिश्रम हवेच असते तर संशोधनात, धीर न सोडता एकटेपणाने अभ्यास व निरीक्षणाची जोड दिली गेली पाहिजे. ‘मला संशोधनाची आवड आहे, त्यातच काही तरी करावेसे वाटते आहे,’ असे म्हणणारे विद्यार्थी खूप असतात. मात्र संशोधन म्हणजे काय किंवा त्यासाठी किती वर्षे देऊन काय शिकावे लागते याची माहिती त्यांना नसते.Write comment (0 Comments) |
| मल्टी जनरेशनल ट्रेनिंगसाठी ई लर्निग | ![]() | ![]() |
| राजीव जोशी, बुधवार, ०९ डिसेंबर २००९ rjoshi@gurukulonline.co.in ई लर्निग हे अनेक स्तरांवर उपयोगी पडू शकते. कुठलंही तंत्रज्ञान हे किती प्रकारे वापरता येते त्यावर त्याचे मूल्य व महत्त्व अवलंबून असते. ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण देण्यासाठी ई लर्निगचा वापर समर्थपणे होऊ शकते, हे आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे. आता आपण मल्टी जनरेशनकरिता ही प्रणाली कशी उपयोगी पडते हे पाहणार आहोत. कोणतंही ऑफिस, फॅक्टरी किंवा वर्क स्टेशन म्हटलं की तिथे भिन्न वयोगटाची माणसे काम करीत असतात. कारण कोणत्याही उद्योगधंद्याला मग ते उत्पादन क्षेत्र असो की, सेवा क्षेत्र- तिथे अनेक प्रकारचे जॉब्स असतात. प्रत्येकाकरिता वेगवेगळ्या वयाची माणसे कामं करत असतात. कोणी नव्याने भरती झालेले तर काही काही वर्षे सेवेत असलेले तर थोडे दीर्घकाळ काम करणारे असतात. |
| यशाचा मार्गदर्शक | ![]() | ![]() |
| शैलजा केळुसकर, बुधवार, ०९ डिसेंबर २००९ संपर्क- ९३२३८७७६२५ यशाची गॅरंटी नावाचं एक छोटंसं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. ‘रंग, रूप, वय, शिक्षण, आर्थिक स्थिती, कशाचीच अट नाही असं लांबलचक उपशीर्षक या पुस्तकाला आहे. हे उपशीर्षक सार्थ ठरवणारा मजकूर या पुस्तकात आहे. हे पुस्तक शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच नव्हे तर थोरामोठय़ांना उपयोगी ठरणारं आहे. किंबहुना मोठय़ांनाच ते अधिक उपयोगी ठरू शकेल. कारण एखादी गोष्ट समजूत घेऊन ती कृतीत वापरण्याचं गांभीर्य मोठय़ांकडेच अधिक असू शकतं. मोठय़ांचा जीवनाकडे बघण्याचा परिपक्वपणा या पुस्तकाचा अधिक लाभ घेऊ शकेल. प्रगती करण्यासाठी या पुस्तकात मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले गेले आहे. यशस्वी होण्यासंदर्भात अलिकडे एक पुस्तक मोठमोठय़ा जाहिरातींतून लोकांपर्यंत पोहोचलं आहे. |
| इंग्रजी बोलण्याची कला | ![]() | ![]() |
| अनिल माने, बुधवार, ०९ डिसेंबर २००९ संपर्क- ९२२३२०९८३८ एकविसाव्या शतकात हवं तसं यश मिळवायचं असेल तर मणसाचं आपल्या मातृभाषेवर, राष्ट्रभाषेवर व जागतिक भाषेवर प्रभुत्व असायला हवं. पहिल्या दोन्ही भाषांचा नियमित सराव होत राहिल्यामुळे त्यांची शक्यतो अडचण येत नाही. पण सर्वत्र इंग्रजी भाषेत शिक्षणाच्या व करिअरच्या अनेक संधी असल्यामुळे तिचा वापर सराईतपणे करता येण्याची गरज असते. केवळ इतर भाषेत शिक्षण घेणाऱ्यालाच नव्हे तर इंग्रजी भाषेत शिक्षण घेणाऱ्या अनेकांना प्रभावशाली ‘इंग्लिश स्पीकिंग’ करता येत नाही. आज गल्लोगल्ली इंग्रजीत बोलायला शिकवणारे वर्ग असले तरी काहींना नेमकी बोलण्याची पद्धत शिकवता न आल्यामुळे केवळ व्याकरण व लिखाण यावर भर देत राहण्याचे प्रकार चालू राहतात. |
| माइन्ड प्रोग्रॅमिंग | ![]() | ![]() |
| विलास मुणगेकर, बुधवार, ०९ डिसेंबर २००९ (व्यवस्थापन प्रशिक्षक), संपर्क- ९८९२०७८७१३ ‘आप की अदालत’ या टीव्हीवरच्या कार्यक्रमात आमीर खान म्हणाला की, गजम्नी या चित्रपटानंतर त्याला आपली स्मरणशक्ती कमी झाल्यासारखे वाटू लागले आहे. त्या अगोदर कधीच असं त्याला विसरल्या विसरल्यासारखं वाटलं नव्हतं. एखादी भूमिका पूर्ण समरस होऊन, जणू ती खरीच आहे, या भावनेने केली जाते तेव्हा त्याचा मनावर खोल ठसा उमटला जाऊ शकतो. जगाच्या व्यासपीठावर ‘आपण’ जी भूमिका जागवत असतो ती आपल्यासाठी खरी होत असते. |
| संगोपन उद्याच्या भवितव्याचे! | ![]() | ![]() |
| प्रा. प्रवीण घोडेस्वार, बुधवार, ०९ डिसेंबर २००९ gpraveen18feb@gmail.com ‘आजचे बालक हे देशाचे भवितव्य आहेत,’ असं म्हटलं जातं. देशाच्या या भवितव्याची आज जर उपेक्षा झाली तर काही खरं नाही, म्हणून त्याची काळजी, त्याचे संगोपन, त्यावर संस्कार घडविणे अत्यंत आवश्यक आहे. ही जबाबदारी कोणी स्वीकारावी? आई-वडिलांनी? बालवाडय़ांनी? समाजाने? ही जबाबदारी पूर्णपणे कोणीही स्वीकारत नाही किंवा स्वीकारू शकत नाही असे म्हटले तरी चूक ठरणार नाही. या बालकांच्या शिक्षण, आरोग्य, सवयी या गोष्टींची काळजी आईवडिलांना घेणं कठीण झालंय. |
| स्वअभ्यास तंत्र हाच विकासाचा मंत्र | ![]() | ![]() |
ज्ञानेश्वर मोळक, बुधवार, ०९ डिसेंबर २००९ कुटुंबातील मुलगा/ मुलगी दहावीला गेले की सारे घर दहावीला बसल्यासारखे वाटते. नववीची परीक्षा दिली की दहावीचा विचार चालू. हल्ली बऱ्याच शाळा नववीची परीक्षा लवकर घेतात. निकालही लवकर लावतात. विद्यार्थ्यांसाठी एक वर्षांऐवजी सव्वा वर्षांचा कालावधी देतात. तरीसुद्धा राज्याचा निकाल ५० ते ६० टक्क्य़ांच्या जवळपास असतो. मग विचार येतो, नेमके चुकते कुठे? काय कमी पडते व काय केले पाहिजे? |
| आधुनिक ग्रंथालय सुरक्षितता | ![]() | ![]() |
| मुरलीधर एस. हेडावू, बुधवार, ०९ डिसेंबर २००९ संपर्क : ९८९०४४९६८१ सर्वसाधारणपणे ग्रंथालय संगणकीकरण म्हणजेच आधुनिकीकरण अशी समजूत असते. ग्रंथालय संगणकीकरणापुढे अनेक स्तरांवर प्रगती करता येते, हे आज पाश्चात देशांतील ग्रंथालयांनी दाखवून दिलेले आहे. ग्रंथालयाचे र्सवकष संगणकीकरण, ग्रंथालय नेटवर्क स्थापणे, ग्रंथालय संकेतस्थळांची निर्मिती करणे, डिजिटल ग्रंथालय अस्तित्वात आणणे व वाचकांना अत्याधुनिक सेवा पुरविणे या गोष्टी ग्रंथालय व्यवस्थापनात अपेक्षित आहेत. आधुनिकीकरणात वरील सर्व गोष्टींबरोबरच ग्रंथालय सुरक्षितता साध्य होणे हे देखील तितकेच महत्त्वाचे झाले आहे |
Subscribe to:
Comments (Atom)


संशोधन म्हणजे काय किंवा त्यासाठी किती वर्षे देऊन काय शिकावे लागते? ‘मला संशोधनाची आवड आहे’ म्हणणाऱ्या प्रत्येकाला या प्रश्नावर नेमके उत्तर नाही याची पुरेपूर जाणीव असते.. कोणत्याही नवनिर्माण आणि सृजनासाठी विलक्षण चिकाटी, सातत्यपूर्ण परिश्रम हवेच असते तर संशोधनात, धीर न सोडता एकटेपणाने अभ्यास व निरीक्षणाची जोड दिली गेली पाहिजे. ‘मला संशोधनाची आवड आहे, त्यातच काही तरी करावेसे वाटते आहे,’ असे म्हणणारे विद्यार्थी खूप असतात. मात्र संशोधन म्हणजे काय किंवा त्यासाठी किती वर्षे देऊन काय शिकावे लागते याची माहिती त्यांना नसते.
ई लर्निग हे अनेक स्तरांवर उपयोगी पडू शकते. कुठलंही तंत्रज्ञान हे किती प्रकारे वापरता येते त्यावर त्याचे मूल्य व महत्त्व अवलंबून असते. ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण देण्यासाठी ई लर्निगचा वापर समर्थपणे होऊ शकते, हे आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे. आता आपण मल्टी जनरेशनकरिता ही प्रणाली कशी उपयोगी पडते हे पाहणार आहोत. कोणतंही ऑफिस, फॅक्टरी किंवा वर्क स्टेशन म्हटलं की तिथे भिन्न वयोगटाची माणसे काम करीत असतात. कारण कोणत्याही उद्योगधंद्याला मग ते उत्पादन क्षेत्र असो की, सेवा क्षेत्र- तिथे अनेक प्रकारचे जॉब्स असतात. प्रत्येकाकरिता वेगवेगळ्या वयाची माणसे कामं करत असतात. कोणी नव्याने भरती झालेले तर काही काही वर्षे सेवेत असलेले तर थोडे दीर्घकाळ काम करणारे असतात.
यशाची गॅरंटी नावाचं एक छोटंसं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. ‘रंग, रूप, वय, शिक्षण, आर्थिक स्थिती, कशाचीच अट नाही असं लांबलचक उपशीर्षक या पुस्तकाला आहे. हे उपशीर्षक सार्थ ठरवणारा मजकूर या पुस्तकात आहे. हे पुस्तक शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच नव्हे तर थोरामोठय़ांना उपयोगी ठरणारं आहे. किंबहुना मोठय़ांनाच ते अधिक उपयोगी ठरू शकेल. कारण एखादी गोष्ट समजूत घेऊन ती कृतीत वापरण्याचं गांभीर्य मोठय़ांकडेच अधिक असू शकतं. मोठय़ांचा जीवनाकडे बघण्याचा परिपक्वपणा या पुस्तकाचा अधिक लाभ घेऊ शकेल. प्रगती करण्यासाठी या पुस्तकात मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले गेले आहे. यशस्वी होण्यासंदर्भात अलिकडे एक पुस्तक मोठमोठय़ा जाहिरातींतून लोकांपर्यंत पोहोचलं आहे.
एकविसाव्या शतकात हवं तसं यश मिळवायचं असेल तर मणसाचं आपल्या मातृभाषेवर, राष्ट्रभाषेवर व जागतिक भाषेवर प्रभुत्व असायला हवं. पहिल्या दोन्ही भाषांचा नियमित सराव होत राहिल्यामुळे त्यांची शक्यतो अडचण येत नाही. पण सर्वत्र इंग्रजी भाषेत शिक्षणाच्या व करिअरच्या अनेक संधी असल्यामुळे तिचा वापर सराईतपणे करता येण्याची गरज असते. केवळ इतर भाषेत शिक्षण घेणाऱ्यालाच नव्हे तर इंग्रजी भाषेत शिक्षण घेणाऱ्या अनेकांना प्रभावशाली ‘इंग्लिश स्पीकिंग’ करता येत नाही. आज गल्लोगल्ली इंग्रजीत बोलायला शिकवणारे वर्ग असले तरी काहींना नेमकी बोलण्याची पद्धत शिकवता न आल्यामुळे केवळ व्याकरण व लिखाण यावर भर देत राहण्याचे प्रकार चालू राहतात.
‘आप की अदालत’ या टीव्हीवरच्या कार्यक्रमात आमीर खान म्हणाला की, गजम्नी या चित्रपटानंतर त्याला आपली स्मरणशक्ती कमी झाल्यासारखे वाटू लागले आहे. त्या अगोदर कधीच असं त्याला विसरल्या विसरल्यासारखं वाटलं नव्हतं. एखादी भूमिका पूर्ण समरस होऊन, जणू ती खरीच आहे, या भावनेने केली जाते तेव्हा त्याचा मनावर खोल ठसा उमटला जाऊ शकतो. जगाच्या व्यासपीठावर ‘आपण’ जी भूमिका जागवत असतो ती आपल्यासाठी खरी होत असते.
‘आजचे बालक हे देशाचे भवितव्य आहेत,’ असं म्हटलं जातं. देशाच्या या भवितव्याची आज जर उपेक्षा झाली तर काही खरं नाही, म्हणून त्याची काळजी, त्याचे संगोपन, त्यावर संस्कार घडविणे अत्यंत आवश्यक आहे. ही जबाबदारी कोणी स्वीकारावी? आई-वडिलांनी? बालवाडय़ांनी? समाजाने? ही जबाबदारी पूर्णपणे कोणीही स्वीकारत नाही किंवा स्वीकारू शकत नाही असे म्हटले तरी चूक ठरणार नाही. या बालकांच्या शिक्षण, आरोग्य, सवयी या गोष्टींची काळजी आईवडिलांना घेणं कठीण झालंय.
कुटुंबातील मुलगा/ मुलगी दहावीला गेले की सारे घर दहावीला बसल्यासारखे वाटते. नववीची परीक्षा दिली की दहावीचा विचार चालू. हल्ली बऱ्याच शाळा नववीची परीक्षा लवकर घेतात. निकालही लवकर लावतात. विद्यार्थ्यांसाठी एक वर्षांऐवजी सव्वा वर्षांचा कालावधी देतात. तरीसुद्धा राज्याचा निकाल ५० ते ६० टक्क्य़ांच्या जवळपास असतो. मग विचार येतो, नेमके चुकते कुठे? काय कमी पडते व काय केले पाहिजे?
सर्वसाधारणपणे ग्रंथालय संगणकीकरण म्हणजेच आधुनिकीकरण अशी समजूत असते. ग्रंथालय संगणकीकरणापुढे अनेक स्तरांवर प्रगती करता येते, हे आज पाश्चात देशांतील ग्रंथालयांनी दाखवून दिलेले आहे. ग्रंथालयाचे र्सवकष संगणकीकरण, ग्रंथालय नेटवर्क स्थापणे, ग्रंथालय संकेतस्थळांची निर्मिती करणे, डिजिटल ग्रंथालय अस्तित्वात आणणे व वाचकांना अत्याधुनिक सेवा पुरविणे या गोष्टी ग्रंथालय व्यवस्थापनात अपेक्षित आहेत. आधुनिकीकरणात वरील सर्व गोष्टींबरोबरच ग्रंथालय सुरक्षितता साध्य होणे हे देखील तितकेच महत्त्वाचे झाले आहे