Thursday, October 7, 2010

रसायनशास्त्राचे नोबेल


  • जपानचे नेगिशी, सुझुकी व अमेरिकेचे रिचर्ड हेक यांना रसायनशास्त्राचे नोबेल
  • जपानचे नेगिशी, सुझुकी व अमेरिकेचे रिचर्ड हेक यांना रसायनशास्त्राचे नोबेलस्टॉकहोम ६ ऑक्टोबर / पीटीआय  औषधनिर्माणशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स या दोन क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारी एक रासायानिक प्रक्रिया शोधून काढल्याबद्दल अमेरिकेचे रिचर्ड हेक व जपानचे इची नेगिशी व अकिरा सुझुकी यांना यंदाचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे,

Wednesday, June 16, 2010

Tuesday, June 15, 2010


गुणवंतांची प्रतिक्रिया : बारावीचा अभ्यास हाच सीइटीचा पायाBookmark and SharePrintE-mail
प्रतिनिधी
vruttant@expressindia.com 

गेल्या काही वर्षांमध्ये इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या निकालापेक्षा सीइटीचे महत्त्व वाढले आहे. सीइटीच्या गुणांवरच भवितव्य ठरत असल्याने सर्व  विद्यार्थी  आजच्या सीइटीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. यावेळी बारावीबरोबरच सीइटीच्या अभ्याक्रमाचा हा बोज्जा सांभाळत अनेक विद्यार्थ्यांनी सीइटीत घवघवीत यश मिळविले. अशाचा काही गुणवंतांच्या या प्रतिक्रिया..
अनिश बिवलकर (पीसीएम- १९९, रुईया महाविद्यालाय)
सीइटीचा अभ्यास हा सर्वस्वी बारावीच्या अभ्यासावर अवलंबून असल्याने मी सप्टेंबपर्यंत बारावीचा अभ्यास पूर्ण  केला आणि त्यानंतर सीइटीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. तसेच अकरावीत असतानाच जुलै माहिन्यापासून दररोज एक ते दोन तास इतका वेळ बारावीच्या अभ्यासासाठी दिला होता. त्याचबरोबर अकरावीतील बेसिक कन्सेप्टसुद्धा पक्क्या केल्या होत्या. याचा पुढे फायदा झाला. बारावी आणि सीइटीसाठी नियमित अभ्यास महत्त्वाचा आहे. सर्व  विषयांना एकसमान वेळ देऊन समतोल अभ्यास केला तर यश मिळवणे सोपे आहे. मला यापुढे इंजिनीअरिंग करायचे असून व्हीजेटीआयला प्रवेश घेण्याची इच्छा आहे.
राहूल दुबे (पीसीएम- १९९, मिठीबाई  महाविद्यालय)
सरतेशेवटी सीईटीचा संपूर्ण  अभ्यासक्रम हा बारावीच्या अभ्यासक्रमावरच अवलंबून आहे. त्यामुळे जर आपले बारावीचे मूलभूत कन्सेप्टस्  पक्के असतील, तर सीइटीचा अभ्यास करताना कठीण जात नाही. तसेच मी जास्तीत जास्त गणिते सोडविण्याचा भरपूर सराव केला होता. त्यामुळे पेपर सोडवताना वेळ वाचला आणि या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवता आले. आता यापुढे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचे असून व्हीजेटीआयमध्ये प्रवेश घेणार आहे.
श्रोनित लधानी (पीसीएम- १९९, साठय़े महाविद्यालय) 
नियामित अभ्यास, एकाग्रता आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडविणे हेच माझ्या सीइटीमधील यशाचे गमक म्हणावे लागेल. रोज मी साधारण तीन तास एकाग्रचित्ताने अभ्यास केला. तसेच इतर वेळी मात्र तितक्याच मोकळेपणाने इतर गोष्टींचाही आनांद लुटला. फक्त अभ्यस एके अभ्यास कधीच केला नाही. त्यााचवेळी सीइटीचा अभ्यास करताना बारावीकडेही तितकेच लक्ष दिले. बारावी हाच सीइटीच्या परीक्षेचा पाया असल्याने या दोन्ही परीक्षांचा समतोल पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. आता यापुढे मी सरदार पटेल किंवा व्हीजेटीआयमध्यो प्रवेश घेऊन सिव्हील इंजिनिअरिंग करणार आहे.
केयूर देसाई  (पीसीबी-१९८, मिठीबाई महाविद्यालय)
मी सुरूवातीपासूनच सीइटीच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. त्यातच माझा बारावीचा अभ्यास होऊन जायचा. फक्त बारावीच्या परीक्षेआधी १०-१५ दिवस मी बारावीचा विशेष लक्ष देऊन अभ्यास केला. त्यामुळे  बारावीत सुद्धा नव्वद टक्के मिळाले.  साीइटीचा अभ्यास करताना मी रसायनशास्त्रातील सूत्रे नीट लक्षात ठेवली होती. त्यात मला पूर्ण ५० गुण मिळाले. तसेच इतर विषयांचा अभ्यास करताना सुद्धा काही खास क्लुप्त्या लक्षात ठेवल्या होत्या. त्यामुळे भरभर पेपर सोडवताना याचा खूप उपयोग झाला. आता यापुढे मला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असून त्यासाठी जेजे किंवा केईएममध्ये प्रवेश घेणार आहे.

    Wednesday, June 9, 2010


    शांतपणे विचारपूर्वक निर्णय घ्या !PrintE-mail
    बुधवार, ९ जून २०१०
    रिझल्ट ते ऑप्शन्स हा काळ २१ ते २४ दिवसांचा आहे. या कालावधीत शांतपणे विचार करून खालील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. पालकांना यांची समर्पक उत्तरं शोधण्यास विद्यार्थ्यांला मदत करता येईल.

    अभियांत्रिकी प्रवेश : विचारांना एक दिशाPrintE-mail
    प्रा. अभय केशव अभ्यंकर , बुधवार, ९ जून २०१०
    www.trialallotment.com
    ९८२२०६७४१७, ९८२२००६०४२

    अभियांत्रिकीच्या प्रवेशासंबंधी अजूनही पालकांच्या आणि  विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आढळतो. काय करावे? कसं करावं? कोणतं कॉलेज? कोणती ब्रँच? नियम? फिज्? अनेक प्रश्न आता घेर करून उभे असतात. या गुंतागुंतीच्या प्रश्नाचा हा मार्गदर्शक वेध..
    अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन! अभिनंदन तुमच्या बारावी/ ए.आय.ई.ई.ई. परीक्षेतील यशाबद्दल! आता आपण सगळेच प्रवेशपरीक्षेच्या (सी.ई.टी.च्या) निकालाची आतुरतेने वाट पाहात आहोत.

    अभियांत्रिकीसाठी प्रवेश प्रक्रियाPrintE-mail
    बुधवार, ९ जून २०१०
    आपल्याला सी.ई.टी. आणि ए.आय.ई.ई.ई.साठी एकच ऑप्शन फॉर्म भरावयाचा आहे. दोन्हीमधील चांगली अलॉटमेंट हीच आपली अलॉटमेंट असेल. समजा तुम्हाला ए.आय.ई.ई.ई.तून दहाव्या क्रमांकाचा ऑप्शन मिळाला आणि सी.ई.टी.तून सातव्या क्रमांकाचा ऑप्शन मिळाला तर तुम्हाला तो सातवा ऑप्शन अलॉट होईल आणि तुमचा दहावा ऑप्शन असलेली जागा रिकामी होईल.

    उन्नतीची नवदिशा : सवयींची ताकदPrintE-mail
    विलास मुणगेकर ,बुधवार, ९ जून २०१०
    संपर्क : ९८९२०७८७१३

    फक्त एक पुस्तक तुमच्या जीवनामध्ये असे काही बदल घडविण्याचे सामथ्र्य ठेवून असते की ज्याच्यामुळे खूप चांगले बदल घडून आल्याचे आपल्या लक्षात येते. पुस्तकं वाचण्यास आळस करणारी मंडळी अथवा वरचेवर पुस्तकं चाळणारी माणसं ठामपणे पुस्तकं वाचून काहीच फायदा नाही होत असे सांगतात. ज्यांनी स्टीवन कवी यांच्या ‘सेव्हन हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ या पुस्तकाचे मनन, चिंतन केले असेल तो माणूस पुस्तकाच्या जादूई परिणामाची महती जगाला सांगू शकतो.

    कोणत्या करिअरला स्कोप आहे?PrintE-mail
    बुधवार, ९ जून २०१०
    आज करिअरच्या हजारो संधी युवकांपुढे उभ्या आहेत. तंत्रज्ञानातील, अर्थव्यवस्थेतील बदलांबरोबर व्यवसायाचे स्वरूपही बदलत आहे. एकीकडे नव्या क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी कुशल व प्रशिक्षित मनुष्यशक्तीची उणीव भासत असताना केवळ पारंपरिक शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांची संख्याही वाढत आहे.
    काही करिअरविषयक कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या विद्यार्थी व पालकांमध्ये करिअरविषयक जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आपल्यासमोर खूप पर्याय असले की, निवड करणेही कठीण बनते. विद्यार्थी व पालकांचा पहिला प्रश्न हा साधारणपणे ‘कोणत्या करिअरला स्कोप आहे?’ हाच असतो.

    नृत्यकलेतील करिअरPrintE-mail
    प्रतिनिधी , बुधवार, ९ जून २०१०
    आजच्या बदलत्या मनोरंजनाच्या विश्वाने करिअरचे अनेकविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे नृत्य. अगदी आता-आतापर्यंत नृत्य वा संगीताकडे फक्त कला म्हणून बघितलं जात असे. ते उपजीविकेचं साधन होऊ शकतं याचा कोणी विचारही केला नसेल, पण आता चित्र एकदम बदललंय. आज नृत्यासारख्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी म्हणून मुलं पुढे येत आहेत आणि पालकही त्यांना पाठिंबा देतायत. नृत्यात जर करिअर करायचं असेल तर त्यासाठी आपला पाया पक्का हवा. म्हणजेच शास्त्रीय नृत्याचं उत्तम शिक्षण हवं.

    दहावीनंतर पुढे काय? (पूर्वार्ध)PrintE-mail
    पुष्कर मुंडले , बुधवार, ९ जून २०१०
    फोन: ९९६९४६९६१०

    एक यक्षप्रश्न. १० वीनंतर पुढे काय? दरवर्षी तो लक्षावधी विद्यार्थ्यांना सतावीत असतो. १० वी हे असे जंक्शन स्टेशन आहे, की या ठिकाणी फार विचारपूर्वक गाडी पकडावयाची असते. परंतु इथून अनेक क्षेत्रांकडे जाणाऱ्या गाडय़ा मिळतात; त्यापैकी आपल्या क्षेत्राकडे नेणारी गाडी कोणती हे ज्याचे त्याने नक्की करावयाचे असते. एकदा गाडी पकडली की मग परत फिरता येत नाही किंवा परत फिरण्याचा हट्ट धरलाच तर त्यात नाहक जीवनातील अमूल्य वेळ आणि पैसा खर्च होऊन मानसिक त्रास वाटय़ास येतो.

    क्रिएटिव्ह फिल्ड- ग्राफिक आर्ट्सPrintE-mail
    अलका रोडे-कुलकर्णी , बुधवार, ९ जून २०१०
    arkstudio_ar@yahoo.in 

    एन.सी.पी.आय. (मुंबई) च्या हॉलमध्ये वेळोवेळी टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रम रंगत चालला होता. नवीन काय? बघण्याची, जाणून घेण्याची आस घेऊन सर्व मंडळी दूरदूर वरून आलेली. डेमो देणारे ड्रॅमॅटिक- प्रशिक्षित प्रेक्षकांना हसवत, चेष्टामस्करी करत कुतूहलाच्या उंचीवर नेत नेत एकेक प्रयोग मोठय़ा स्क्रिन्सवर दाखवत होते. सर्वच हायटेक! उत्तमोत्तम प्रात्यक्षिकांची मालिका..!

    इंटरनेट रेडियो -ई-लर्निग टूलPrintE-mail
    गौरी मांजरेकर , बुधवार, ९ जून २०१०
    email-gauri.manjrekar15@gmail.com
    Tel-9223048299

    ‘इंटरनेट रेडियो’ केंद्र निर्माण करण्यासाठी आवश्यक वेब संकेत स्थळांची सूची  - www.Live365.com
    - www.ubroadcast.com
    - www.shoutcast.comldownload
    (हे ‘फ्री’ आहे)
    -www.peercast.org
    ‘इंटरनेट रेडियो’चा वापर ई-लर्निग टूल म्हणून कसा करता येईल याचे विवेचन मुंबई विद्यापीठातील ‘मस्ट रेडियो’ या कम्युनिटी रेडियोचे कार्यक्रम संचालक पंकज आठवले यांनी केले.