बुधवार, ९ जून २०१०
रिझल्ट ते ऑप्शन्स हा काळ २१ ते २४ दिवसांचा आहे. या कालावधीत शांतपणे विचार करून खालील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. पालकांना यांची समर्पक उत्तरं शोधण्यास विद्यार्थ्यांला मदत करता येईल.
|
प्रा. अभय केशव अभ्यंकर , बुधवार, ९ जून २०१०
www.trialallotment.com
९८२२०६७४१७, ९८२२००६०४२
अभियांत्रिकीच्या प्रवेशासंबंधी अजूनही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आढळतो. काय करावे? कसं करावं? कोणतं कॉलेज? कोणती ब्रँच? नियम? फिज्? अनेक प्रश्न आता घेर करून उभे असतात. या गुंतागुंतीच्या प्रश्नाचा हा मार्गदर्शक वेध..
अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन! अभिनंदन तुमच्या बारावी/ ए.आय.ई.ई.ई. परीक्षेतील यशाबद्दल! आता आपण सगळेच प्रवेशपरीक्षेच्या (सी.ई.टी.च्या) निकालाची आतुरतेने वाट पाहात आहोत.
|
बुधवार, ९ जून २०१०
आपल्याला सी.ई.टी. आणि ए.आय.ई.ई.ई.साठी एकच ऑप्शन फॉर्म भरावयाचा आहे. दोन्हीमधील चांगली अलॉटमेंट हीच आपली अलॉटमेंट असेल. समजा तुम्हाला ए.आय.ई.ई.ई.तून दहाव्या क्रमांकाचा ऑप्शन मिळाला आणि सी.ई.टी.तून सातव्या क्रमांकाचा ऑप्शन मिळाला तर तुम्हाला तो सातवा ऑप्शन अलॉट होईल आणि तुमचा दहावा ऑप्शन असलेली जागा रिकामी होईल.
|
विलास मुणगेकर ,बुधवार, ९ जून २०१०
संपर्क : ९८९२०७८७१३
 फक्त एक पुस्तक तुमच्या जीवनामध्ये असे काही बदल घडविण्याचे सामथ्र्य ठेवून असते की ज्याच्यामुळे खूप चांगले बदल घडून आल्याचे आपल्या लक्षात येते. पुस्तकं वाचण्यास आळस करणारी मंडळी अथवा वरचेवर पुस्तकं चाळणारी माणसं ठामपणे पुस्तकं वाचून काहीच फायदा नाही होत असे सांगतात. ज्यांनी स्टीवन कवी यांच्या ‘सेव्हन हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ या पुस्तकाचे मनन, चिंतन केले असेल तो माणूस पुस्तकाच्या जादूई परिणामाची महती जगाला सांगू शकतो.
|
बुधवार, ९ जून २०१०
आज करिअरच्या हजारो संधी युवकांपुढे उभ्या आहेत. तंत्रज्ञानातील, अर्थव्यवस्थेतील बदलांबरोबर व्यवसायाचे स्वरूपही बदलत आहे. एकीकडे नव्या क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी कुशल व प्रशिक्षित मनुष्यशक्तीची उणीव भासत असताना केवळ पारंपरिक शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांची संख्याही वाढत आहे.
काही करिअरविषयक कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या विद्यार्थी व पालकांमध्ये करिअरविषयक जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आपल्यासमोर खूप पर्याय असले की, निवड करणेही कठीण बनते. विद्यार्थी व पालकांचा पहिला प्रश्न हा साधारणपणे ‘कोणत्या करिअरला स्कोप आहे?’ हाच असतो.
|
प्रतिनिधी , बुधवार, ९ जून २०१०
आजच्या बदलत्या मनोरंजनाच्या विश्वाने करिअरचे अनेकविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे नृत्य. अगदी आता-आतापर्यंत नृत्य वा संगीताकडे फक्त कला म्हणून बघितलं जात असे. ते उपजीविकेचं साधन होऊ शकतं याचा कोणी विचारही केला नसेल, पण आता चित्र एकदम बदललंय. आज नृत्यासारख्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी म्हणून मुलं पुढे येत आहेत आणि पालकही त्यांना पाठिंबा देतायत. नृत्यात जर करिअर करायचं असेल तर त्यासाठी आपला पाया पक्का हवा. म्हणजेच शास्त्रीय नृत्याचं उत्तम शिक्षण हवं.
|
पुष्कर मुंडले , बुधवार, ९ जून २०१०
फोन: ९९६९४६९६१०
एक यक्षप्रश्न. १० वीनंतर पुढे काय? दरवर्षी तो लक्षावधी विद्यार्थ्यांना सतावीत असतो. १० वी हे असे जंक्शन स्टेशन आहे, की या ठिकाणी फार विचारपूर्वक गाडी पकडावयाची असते. परंतु इथून अनेक क्षेत्रांकडे जाणाऱ्या गाडय़ा मिळतात; त्यापैकी आपल्या क्षेत्राकडे नेणारी गाडी कोणती हे ज्याचे त्याने नक्की करावयाचे असते. एकदा गाडी पकडली की मग परत फिरता येत नाही किंवा परत फिरण्याचा हट्ट धरलाच तर त्यात नाहक जीवनातील अमूल्य वेळ आणि पैसा खर्च होऊन मानसिक त्रास वाटय़ास येतो.
|
अलका रोडे-कुलकर्णी , बुधवार, ९ जून २०१०
arkstudio_ar@yahoo.in
एन.सी.पी.आय. (मुंबई) च्या हॉलमध्ये वेळोवेळी टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रम रंगत चालला होता. नवीन काय? बघण्याची, जाणून घेण्याची आस घेऊन सर्व मंडळी दूरदूर वरून आलेली. डेमो देणारे ड्रॅमॅटिक- प्रशिक्षित प्रेक्षकांना हसवत, चेष्टामस्करी करत कुतूहलाच्या उंचीवर नेत नेत एकेक प्रयोग मोठय़ा स्क्रिन्सवर दाखवत होते. सर्वच हायटेक! उत्तमोत्तम प्रात्यक्षिकांची मालिका..!
|
गौरी मांजरेकर , बुधवार, ९ जून २०१०
email-gauri.manjrekar15@gmail.com
Tel-9223048299
‘इंटरनेट रेडियो’ केंद्र निर्माण करण्यासाठी आवश्यक वेब संकेत स्थळांची सूची - www.Live365.com
- www.ubroadcast.com
- www.shoutcast.comldownload
(हे ‘फ्री’ आहे)
-www.peercast.org
‘इंटरनेट रेडियो’चा वापर ई-लर्निग टूल म्हणून कसा करता येईल याचे विवेचन मुंबई विद्यापीठातील ‘मस्ट रेडियो’ या कम्युनिटी रेडियोचे कार्यक्रम संचालक पंकज आठवले यांनी केले.
|
|
|
No comments:
Post a Comment