Monday, June 7, 2010

कॉपीमुक्तीची यथोगाथा!PrintE-mail
सुप्रिया देवस्थळी- कोलते - सोमवार, ७ जून २०१०
नांदेड जिल्ह्य़ात राबवल्या गेलेल्या कॉपीमुक्ती अभियानाची ही यशोगाथा. येथील काही भागांत पूर्वी  ८० ते ९०% असा निकाल लागायचा. तो यंदा एकदम २५% वर आला. लोहा, कंधार, मुखेड, नायगाव या कॉपीसाठी कुप्रसिद्ध तालुक्यांतील बारावीचा निकाल तर यंदा १०% च्या आसपास घसरला. नांदेड जिल्हा प्रशासनातील डॉ. श्रीकर परदेशी आणि श्रावण हर्डीकर या अधिकाऱ्यांच्या या योगदानाबद्दल-
गेल्या वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षांच्या काळात एका बातमीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
 
अभियांत्रिकी प्रवेशाची मेखPrintE-mail
प्रा. अभय केशव अभ्यंकर - सोमवार, ७ जून २०१०
www.trialallotment.com
संपर्क- 98220-67417, 98220-06042
स्वायत्त महाविद्यालयांचे अर्ज सीईटीच्या निकालापासून मिळण्यास सुरुवात होईल आणि अर्ज भरण्यासाठी सीईटीमध्ये किमान ११० मार्क मिळणे आवश्यक आहेत. (राखीव जागांसाठी किमान १०० मार्क आवश्यक) या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात एआयईईईमधून जागा नाहीत, मॅनेजमेंट सीटस् नाहीत, विश्वकर्मा (व्हीआयटी)मध्ये मात्र मॅनेजमेंटसाठी २० टक्के जागा आहेत. स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ही मुलाखत पद्धतीने चालते. यासाठी त्या प्रवेश फेरीच्या वेळी उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे.
 
निक्काल..!PrintE-mail
आशिष पेंडसे - सोमवार, ३१ मे २०१०
ashish.pendse@expressindia.com
नाशिकच्या शिक्षणसमृद्धी योजनेचे फळ, लातूर पॅटर्नचा फुगा फुटला, मुलींचीच यंदा सरशी, गुणवत्ता यादीबरोबरच टॉपर्सची नावेही आता इतिहासजमा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निकालाची ऑनलाइन क्रांती!
 
‘नाशिक पॅटर्न’चा उदयPrintE-mail
अनिकेत साठे - सोमवार, ३१ मे २०१०
aniket.sathe@expressindia.com
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि पुणे, लातूर यांसारख्या नेहमीच ‘यशस्वी’ ठरणाऱ्या विभागांना मागे सारत नाशिकचे नाव पुढे आले. नाशिक विभागातील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण संस्था, प्राध्यापक संघटना यांनी अशा कोणत्या उपाययोजना राबविल्या की जेणेकरून ही जादू झाली, याचीच चर्चा सर्वत्र सुरू झाली. मुळात केवळ विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे हे एकमेव ध्येय नजरेसमोर ठेवून आखण्यात आलेल्या उपक्रमांनी विभागास थेट अव्वलस्थानी नेवून ठेवले. अखेर या उपाययोजना, हे उपक्रम आहेत तरी कोणते?
 

No comments:

Post a Comment