Sunday, September 6, 2009

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे बी.सी.ए. व अ‍ॅनिमेशन पदवी अभ्यासक्रमPrintE-mail
बुधवार, २ सप्टेंबर २००९
अशोक फाटक- संपर्क- ९३२४७५९१६४

एकविसावे शतक हे संगणकीय युग म्हणून ओळखले जाते. या युगात सर्वानाच संगणकीय क्रांतीने झपाटले आहे. प्रत्येक जण या क्रांतीचा भाग झाला आहे. आजच्या काळात संगणकाशिवाय आपला एक क्षण जाणार नाही ऐवढे आपण संगणकीशी एकजीव झाले आहोत. अर्थातच त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात संगणकाचे ज्ञान असलेल्यांची आवश्यकता मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस ही मागणी वाढतच जाणार आहे. जागतिकीकरणामुळे जग जवळ आले असताना प्रत्येकाने संगणकाचे ज्ञान मिळविणे ही काळाची गरज ठरली आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात चांगले करिअरही करता येऊ शकते. आधुनिक काळातल्या या अभ्यासक्रमामुळे चांगले रोजगार आपल्याला मिळू शकतात. तरुणांना अशा प्रकारचे अभ्यास करुन भविष्यात एक चांगले करिअर घडविता येऊ शकते. अशा प्रकारे काळाची गरज ओळखून तसेच भविष्यात चांगला उत्कर्ष करता येईल अशा, बॅचरल ऑफ कॉमप्युटर अ‍ॅप्लिकेशन्स (बी.सी.ए.) व बी.एस.सी. (मिडिया ग्राफिक्स व अ‍ॅनिमेशन) अभ्यासक्रमांची आखणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने केली आहे. हे अभ्यासक्रम मुंबईत काही निवडक केंद्रात सुरु करण्यात आले असून याला विद्यापिठाची मान्यता आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम विद्यापीठाव्दारे प्रथमच विद्यार्थ्यांना उपलव्ध होत आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्र सरकारने खास कायद्याने स्थापन केले असून त्याला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता आहे. येथून मिळणारी पदवी ही देशात तसेच देशाबाहेर नोकरीसाठी मान्यताप्राप्त आहे. तसेच पुढील उच्चशिक्षणासाठी ही परिक्षा पात्र ठरते.
बॅचरल ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स (बी.सी.ए.)- यासाठी किमान कोणत्याही शाखेतून १२ परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याशिवाय सरकारी मान्यता असलेले कोणतेही पदविकाधारक विद्यार्थी यासाठी पात्र ठरु शकतात. येथील परिक्षा पास झाल्यावर संगणकीय क्षेत्रात पदवी होण्याची संधी मिळते. शिवाय नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही पदवी संपादन करता येत नाही. त्यांच्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा अभ्यासक्रम अर्धवेळ असल्याने नोकरी करणारे विद्यार्थी हे करु शकतात. विद्यापीठातर्फे सर्व अभ्यास साहित्य, पाठय़पुस्तके, प्रोग्रॅमिंगचे वर्कबुक, दिले जाते. ही परिक्षा ऑनलाईन असल्याने विद्यार्थ्यांना तात्काळ गुणपत्रक मिळते.
बी.एस.सी. (मिडिया ग्राफिक्स व अ‍ॅनिमेशन)- हा अभ्यासक्रम देशातील विद्यापीठाने मान्यता दिलेला एकमेव आहे. अ‍ॅनिमेशनसारख्या झपाटय़ाने वाढत चाललेल्या क्षेत्रातील विद्यापीठाचा मान्यताप्राप्त असा हा पहिलाच अभ्यासक्रम आहे. मुंबईत किर्ती इन्स्टिटय़ूटला हा अभ्यासक्रम घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठीही किमान १२वी असणे आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून परिक्षा विद्यापीठातर्फे घेतली जाते. विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सुविधा देण्यात आली आहे.

    No comments:

    Post a Comment