Sunday, September 6, 2009

‘एसएनडीटी’मध्ये मुलींसाठी हॉस्पिटॅलिटी आणि कॅटरिंग मॅनेजमेंटमध्ये पदविका अभ्यासक्रम
दहावी व बारावीची परीक्षा आणि निकाल म्हणजे तरुणांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वळण. या वळणावरच पुढील आयुष्याचा मार्ग ठरवावयाचा असतो. संपूर्ण जीवनालाच कलाटणी देणारे हे वळण. आपली आवड उपलब्ध असणारे मार्ग आणि श्रम घेण्याची तयारी या सर्वाचा एकत्रित विचार करून निर्णय घेण्याचा हा टप्पा असतो.
आजच्या या स्पर्धेच्या जगात, जरा हटके, वेगळं करिअर निवडायची ज्यांची तयारी आहे, ज्यांनी खूप चॅलेंजेस घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. एकविसाव्या शतकामध्ये हॉटेल इंडस्ट्री खूप जोमात आहे. आज मध्यमवर्गीय कुटुंबे देखील उन्हाळ्याच्या अथवा हिवाळ्याच्या सुट्टीत विरंगुळ्यासाठी चार- आठ दिवस सहकुटुंब फिरायला जाऊ लागलेत. नेहमीच्या चाकोरीबद्ध जीवनातून काही काळ विरंगुळा प्रत्येकालाच हवा आहे. त्यामुळे हॉटेल इंडस्ट्री जोमात असल्यास नवल ते काय? या हॉटेल इंडस्ट्रीसाठी प्रशिक्षित लोकांची

मागणी खूप आहे. पण अद्याप तसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. यासाठी हमखास नोकरी मिळवून देणारा हा अभ्यासक्रम आहे. हा एकूण दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये सहा महिन्यांसाठी नामांकित हॉटेल्समध्ये इंटर्नशिपसाठी विद्यार्थिनीना पाठविले जाते. उदा. ताज पॅलेस अ‍ॅण्ड हॉटेल्स, अँबेसेडर्स, स्काय शेफ, ताज प्रेसिडेंट, सन-न- सॅण्ड, ताज सेंटस, कोहिनूर कॉन्टिनेन्टल, ले मेरिडेअन, आयटीसी सेंट्रल शेरेटन, ग्रॅण्ड हयात इ.
एअर लाइन्स, हॉटेल्स, जहाज, रेस्टॉरंट, इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या डिशेस कशा तयार करायच्या, पाटर्य़ा, मेजवान्या कशा कौशल्यपूर्वक हाताळायच्या इ. बाबतचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण इथे दिले जाते. टेबल मॅनर्स, टेबल सेट-अप, मेनू सवर्ि्हग यांचेही प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. हॉटेल्समध्ये रूम्सचे मेंटेनन्स कसे करावे, रूम अधिक आकर्षक कशी करता येईल याचाही अभ्यासक्रमात समावेश आहे. हल्ली लोकांच्या आवडी- निवडी बदलल्या आहेत. केवळ भारतीय चवीचं जेवणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. यात इटालियन, मेक्सिकन पद्धतीचे जेवण, वेगवेगळ्या डिशेस कशा तयार कराव्यात, त्या कोणत्या पद्धतीने सव्‍‌र्ह कराव्यात याचाही या अभ्यासक्रमात समावेश आहे.
हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फ्रंट ऑफिस- ज्याला आपण रिसेप्शन म्हणतो, हा खूप महत्त्वाचा विभाग असतो. येणाऱ्या गेस्टस्शी विनम्रपणे कसे बोलावे, सर्व सुविधा कशा पुरवाव्यात, तसेच फ्रंट ऑफिस कसे सांभाळावे हेही शिकविले जाते. याशिवाय बेकरी, सॅलेड डेकोरेशन, गारनिशिंग, संगणक इ. गोष्टींचाही अभ्यासक्रमात समावेश आहे. दरवर्षी या विद्यार्थिनीना एक थीम दिली जाते आणि त्यानुसार ‘थीम डिनर’ प्लॅन करून एक्झिक्युटही करावे लागते. विद्यार्थिनींनीच थीम निवडून त्याप्रमाणे सर्व समावेश, जेवणाचे पदार्थ तयार करणे, तिकिट सेल करणे इ. गोष्टी करावयाच्या असतात. यामधून पार्टीज कशा ऑर्गनाइज्ड करायच्या याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. हा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थिनीपैकी काहीजण रिट्झ, वीटझ, सन-एन-सॅड, ग्रॅण्ड हयात, मेरिडिअन (पुणे) इ. अशा नामांकित हॉटेल्समधून काम करीत आहेत. स्वत:चा कॅटरिंगचा बिझनेसही सुरू करता येतो.
या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी किमान बारावीची परीक्षा ५० टक्के गुणासह पास असणे आवश्यक आहे. ज्यांना चाकोरीबद्ध करिअरमधून जायचे नाही आणि नवीन चॅलेंजस घ्यायची तयारी आहे, अशा आणि ज्यांना हटके काही तरी करायचे आहे, अशा सर्वासाठी प्रवेश सुरू आहे. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर त्वरीत संपर्क साधा- निरंतर व प्रौढशिक्षण विभाग, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, पाटकर हॉल बिल्डिंग, पहिला मजला, चर्चगेट, मुंबई- ४०००२०. दूरध्वनी क्रमांक- २२६६८९२ किंवा २२०३१८७९ एक्स्टेंशन क्रमांक २५८, २३०.
व्ही. चक्रवर्ती

No comments:

Post a Comment