Wednesday, September 9, 2009

मरीन इंजिनीअरिंग, र्मचट नेव्हीला पुन्हा उभारी
व्यापारासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सीमा कधीच्याच मोडून पडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे सहकार्य उदयाला येत आहे. व्यापार, अधिक व्यापार आणि अधिक नफा हेच एकमेव उद्दिष्ट ठेवण्यात येत आहे. अशा या व्यापारवृद्धीच्या काळात मरीन इंजिनीअरिंग व र्मचट नेव्हीला मोठे महत्त्व प्रश्नप्त होत आहे. जागतिकीकरणाच्या सध्याच्या काळात व्यापारउदिमाला तुफान गती आली आहे. प्रत्येक देश आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीसाठी प्रयत्नशील आहे. व्यापारासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सीमा कधीच्याच मोडून पडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय

स्तरावर विविध प्रकारचे सहकार्य उदयाला येत आहे. व्यापार, अधिक व्यापार आणि अधिक नफा हेच एकमेव उद्दिष्ट ठेवण्यात येत आहे. ज्या ओसामा बिन लादेनच्या पाठी जॉर्ज बुश लागले आहेत त्याच्याच एका कंपनीसोबत बुश यांच्या एका कंपनीचे व्यापारविषयक सहकार्य होते असे वृत्त मध्यंतरी झळकले होते. अशा या व्यापारवृद्धीच्या काळात मरीन इंजिनीयरिंग व र्मचट नेव्हीला मोठे महत्त्व प्रश्नप्त होत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या कानावरून नावे नक्कीच गेली असणार.
जागतिकीकरणामुळे सागरावरील व्यापार मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सागर आणि जहाज या अनुषंगाने असलेल्या विविध अभ्यासक्रमांनासुद्धा चांगले मार्केट मिळत आहे. प्रत्येक देश आपल्या व्यापार व्यवसायाच्या सीमा विस्तारण्याच्या प्रयत्नात आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे तशी संधी मुक्तपणे उपलब्ध झाल्या आहेत. हवाई मार्गासोबतच सागरी मार्गाने व्यापार मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. सागरमार्गे व्यापाराची परंपरा शतकानुशतकांची आहे. आता अत्याधुनिक जहाजांमुळे सागरी मार्गाद्वारे मालवाहतुकीला नवे परिमाण लाभले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील करिअरच्या संधी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. सागरावर साहस गाजवण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या तरुणांसाठी हे क्षेत्र म्हणजे पर्वणीच आहे. उत्तम वेतन आणि सुविधा हे या करिअरचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे.
मरीन इंजिनीयरिंग या विषयातील अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे:
अॅकॅडमी ऑफ मेरिटाइम एज्युकेशन अॅण्ड ट्रेनिंग:
या संस्थेतर्फे दोन अभ्यासक्रम घेतले जातात.
* हायर नॅशनल डिप्लोमा इन मरीन इंजिनीयरिंग.
* हायर नॅशनल डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स
अर्हता: १२वीला भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र हे विषय घेतलेले असावेत.
निवड: लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे. ही परीक्षा संस्थेच्या कांथूर येथील कॅम्पसमध्ये घेतली जाते. त्यानंतर वैद्यकीय तपासणी घेतली जाते. हा अभ्यासक्रम ब्रिटनच्या ‘‘ग्लासगो कॉलेज ऑफ नॉटिकल स्टडीज’’च्या सहकार्याने चालवला जातो. पहिल्या वर्षाचे प्रशिक्षण हे ‘‘अॅकॅडमी ऑफ मेरिटाइम एज्युकेशन अॅण्ड ट्रेनिंग’’च्या चेन्नई शाखेत दिले जाते. दुसऱ्या वर्षाचे प्रशिक्षण ब्रिटनमधील ‘‘ग्लासगो कॉलेज ऑफ नॉटिकल स्टडीज’’ येथे दिले जाते. ही संस्था ‘‘बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’’ या संस्थेची विस्तारित शाखा म्हणून कार्यरत आहे.
संस्थेमार्फत र्मचट नेव्हीचे पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत-
* बी.ई. (मरीन इंजिनीयरिंग)
कालावधी: चार वर्षे
हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना जहाजाचा मुख्य अभियंता बनण्याची संधी मिळू शकते.
* बी.एससी (नॉटिकल सायन्स)
कालावधी: तीन वर्षे
अर्हता: १२वी (विज्ञान-गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र)
वयोमर्यादा: ३१ जुलै रोजी १७ ते २० वर्षे
हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जहाजाचा कप्तान बनण्याची संधी मिळू शकते.
* बी.ई. ऑनर्स इन नेव्हल आर्किटेक्चर अॅण्ड ऑफशोअर इंजिनीयरिंग
कालावधी: चार वर्षे
अर्हता: ६० टक्के गुणांसह १२वी विज्ञान गणित भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र
* अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन नेव्हल आर्किटेक्चर अॅण्ड शिपबिल्डिंग टेक्नॉलॉजी
कालावधी: तीन वर्षे
अर्हता: ६० टक्के गुणांसह १२वी विज्ञान, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र
अर्ज व माहितीसाठी ४०० रुपयांचा डीडी ‘‘एएमईटी चेन्नई’’ या नावे पाठवावा.
पत्ता: एमईटी कॅम्पस्, १३५ ईस्ट कोस्ट रोड, कांथूर चेन्नई-६०३११२ तामिळनाडू
दूरध्वनी: (०४४)-२७४७२१५५
२७४७२१५७
वेबसाइट: www.ametindia.com
तोलाणी मेरिटाइम इन्स्टिटय़ूट:
पुण्याजवळ असणाऱ्या तळेगाव-दाभाडेस्थित ‘‘तोलानी मेरिटाईम इन्स्टिटय़ूट’’ या आयएसओ ९००१-२००० हे गुणवत्तेचे प्रमाणपत्र प्रश्नप्त झालेल्या संस्थेने पिलाणीस्थित ‘‘बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स’’ या संस्थेच्या सहकार्याने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या संस्थेमध्ये दरवर्षी १६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
* बॅचलर ऑफ सायन्स इन मरीन इंजिनीयरिंग
* बॅचलर ऑफ सायन्स इन नॉटिकल टेक्नॉलॉजी
कालावधी: चार वर्षे
अर्हता: १२ वी विज्ञान (भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र सरासरीने ६० टक्के आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण) विद्यार्थी अविवाहित असावा. जन्म १ जानेवारी १९८६ला किंवा त्यानंतर झालेला असावा. तो शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम असावा.
निवड: या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी संगणकावर आधारित (कॉम्प्युटर-बेस्ड) चाचणी आणि मुलाखत इंदुरी येथे घेण्यात येते. भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि इंग्रजी या विषयांतील उमेदवाराचे ज्ञान तपासणारी ही चाचणी असते. वैद्यकीय तपासणी आणि मुलाखतीनंतर अंतिम निवड केली जाते. हा अभ्यासक्रम करण्याची तसेच मरीन इंजिनीयर म्हणून कार्य करण्याची विद्यार्थ्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमता आहे किंवा नाही याची चाचपणी मुलाखतीद्वारे केली जाते.
पत्ता: तोलानी मेरिटाईम इन्स्टिटय़ूट, अॅट अॅण्ड पोस्ट इंदुरी, तळेगाव-दाभाडे, पुणे ४१०५०७.
दूरध्वनी: (०२११४) २४१८७०/२४१८७७३
वेबसाइट: www.tolani.edu
महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अॅण्ड ट्रेनिंग:
या संस्थेतर्फे दोन अभ्यासक्रम घेतले जातात.
* बी.टेक इन मरीन इंजिनीयरिंग: चार वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमामुळे उत्तम प्रकारचे करियर करता येणे सहज शक्य होते. या अभ्यासक्रमाला डायरेक्टर जनरल शिपिंग यांची मान्यता मिळाली आहे. हा निवासी अभ्यासक्रम आहे. १२वी विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ६० टक्के गुण, इंग्रजीत ५० टक्के गुण मिळणे आवश्यक) झालेल्या विद्यार्थ्यांला हा अभ्यासक्रम करता येतो. विद्यार्थी वैद्यकीयदृष्टय़ा तंदुरुस्त असावा. त्याला रातांधळेपणा नसावा. वय २० वर्षापेक्षा अधिक नसावे. निवड: लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे
अर्ज व माहितीपत्रकासाठी ३०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट ‘‘एमएनईटी पुणे’’ या नावे पाठवावा. माहितीपत्रकासाठी www.manetpune.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
पत्ता: गट नंबर १४०, लोणी काळभोर, राजबाग, पुणे-सोलापूर हायवे, पुणे-४२१२०१.
दूरध्वनी; (०२०) २६९१२९०१
२६९१२९०२
२६९१२९०३
२६९१२९०४
* बॅचलर ऑफ सायन्स इन नॉटिकल सायन्स:
हा अभ्यासक्रम भारत सरकारच्या नौकानयन विभागामार्फत इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने प्रशिक्षणार्थी जहाज चाणक्य येथे चालवला जातो.
अर्हता: १२वी विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ५५ टक्के. इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळणे आवश्यक किंवा ५५ टक्के गुणांसह बीएस्सी भौतिक शास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र किंवा ५० टक्के गुणांसह बी.ई. वा अभियांत्रिकी पदविका.
कालावधी: एक वर्ष, वयोमर्यादा- किमान २० वर्षे आणि कमाल २४ वर्षे. मुलींसाठी वयात दोन वर्षे सूट. रातांधळेपणा नको.
निवड: लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे ही परीक्षा इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामार्फत देशभरातील विविध केंद्रांवर साधारणत: जून महिन्यात घेतली जाते.
अर्ज व माहिती पत्रकासाठी ५०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट ‘आयजीएनओयू नवी दिल्ली’ या नावे पाठवावा.
पत्ता- कुलसचिव, एसआर अॅण्ड ई डीआयजीएनओयू, ब्लॉक १२, मैदान घारी, नवी दिल्ली- ११००६८. दूरध्वनी (०११) २९५३४४२९, (०२२) २७७०३८७६, वेबसाइट- www.ignou.ac.in
वेल्स अॅकॅडमी ऑफ मेरिटाईम स्टडीज-
या अकादमीतर्फे पुढील अभ्यासक्रम घेतले जातात-
बीएस्सी नॉटिकल सायन्स, कालावधी तीन वर्षे. डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, कालावधी दोन वर्षे.
बी.ई. मरीन इंजिनीअरिंग, कालावधी चार वर्षे. डिप्लोमा इन मरीन इंजीनिअरिंग, कालावधी दोन वर्षे.
या अभ्यासक्रमांना डायरेक्टर जनरल, शिपिंग यांची मान्यता मिळाली असून ते अभ्यासक्रम मद्रास युनिव्हर्सिटीशी संलग्न आहेत.
अर्हता- १२ वी सायन्स (भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि गणितात सरासरीने ६० टक्के गुण, इंग्रजीत ५० टक्के गुण मिळणे आवश्यक.) झालेल्या मुलाला किंवा मुलीला हा अभ्यासक्रम करता येतो. विद्यार्थी वैद्यकीयदृष्टय़ा तंदुरुस्त असावा. त्याला रातांधळेपणा नसावा. त्याचे वय २० वर्षापेक्षा अधिक नसावे.
निवड- विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी चेन्नई येथे परीक्षा- मुलाखती घेतल्या जातात. अर्ज व माहितीपत्रकासाठी २०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट ‘वेल्स अॅकॅडमी ऑफ मेरीटाईम स्टडीज, चेन्नई’ या नावाने पाठवावा.
पत्ता- वेल्स अॅकॅडमी ऑफ मेरिटाइम स्टडीज, वेलानु नगर, पी. व्ही. वैथैयािलगम रोड, पल्लवरम् चेन्नई, तामिळनाडू. दूरध्वनी (०४०) २२६६२५१२, २२६६२५१५, वेबसाइट- www.velsmaritime.com
ट्रेनिंगशिप रहमान
या ठिकाणी घेतले जाणारे तीन अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे-
बी.एस्सी. इन नॉटिकल सायन्स, अर्हता- १२ वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांत सरासरीने ६० टक्के गुण हवेत. इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण.) कालावधी- तीन वर्षे, वयोमर्यादा- २० वर्षे, निवड- स्पर्धा परीक्षेद्वारे.
प्री-सीजीपी रेटिंग, अर्हता- ४० टक्के गुणांसह १० वी, वयोमर्यादा- १७ ते २० वर्षे
सर्टिफिकेट कोर्स इन मेरिटाईम केटरिंग, अर्हता- ४० टक्के गुणांसह १० वी, वयोमर्यादा १७ ते २० वर्षे, निवड- स्पर्धा परीक्षेद्वारे.
पत्ता- द कॅप्टन सुपरिंटेंडन्ट, टी. एस. रहमान जहाज, महाल अॅनेक्स, १७० के, समंदर पॉइन्ट इस्टेट, वरळी- ४०००१८. दूरध्वनी (०२०) २४९३३३२४, वेबसाइट- www.tsrahman.org
मरीन इंजीनिअरिंग अॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट
या संस्थेतर्फे घेतला जाणारा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे-
बी.एस्सी इन मेरिटाइम सायन्स,
कालावधी- तीन वर्षे,
अर्हता- १२ वी विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित). उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९८७ रोजी वा त्यानंतर झालेला असावा.
निवड- आयआयटी जॉइन्ट एन्ट्रन्स एक्झ्ॉमिनेशनद्वारे.
पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मेरिटाइम स्टडीज, द्वारा लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ अॅडव्हान्स्ड मेरिटाइम स्टडीज अॅण्ड रिसर्च, हे बंदर रोड, मुंबई- ४०००३३. वेबसाइट- www.dgshipping.com
टी.एस. चाणक्य-
जहाजावरील या प्रशिक्षणकेंद्रात एक अभ्यासक्रम घेतला जातो.
प्री-सी डेक कॅडेट- साडेतीन महिने कालावधीच्या या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराला १२ वी विज्ञान (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित) या विषयांत सरासरीने ६० टक्के गुण मिळायला हवेत. इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के.
वयोमर्यादा- किमान साडेसतरा, कमाल वीस. मुलींसाठी वयामध्ये दोन वर्षे सूट. उमेदवार वैद्यकीयदृष्टय़ा तंदुरुस्त असावा. ही चाचणी मेडिकल एक्झ्ॉमिनेशन फॉर सीफेर्स रूल्सनुसार घेतली जाते. रातांधळेपणा नसावा. कोणताही दृष्टिदोष नसावा. एससी आणि एसटीसाठी जागा राखीव ठेवण्यात येतात. विद्यार्थ्यांची निवड मेरिटनुसार करण्यात येते. भारत सरकारतर्फे या अभ्यासक्रमाचा प्रश्नरंभ ‘चाणक्य’ या जहाजावर १ सप्टेंबरपासून होतो.
पत्ता- टी. एस. चाणक्य, भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ शिपिंग, कारावे, नेरूळ, नवी मुंबई- ४००७०६. दूरध्वनी (०२२) २७७०३८७६
सर्टिफिकेट कोर्स इन मेरिटाईम केटरिंग: रहमान जहाजावरील प्रशिक्षण केंद्रात घेतला जाणारा एक अभ्यासक्रम आहे.
कालावधी- सहा महिने.
अर्हता- कोणत्याही विषयासह १२ वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना हा अभ्यासक्रम करता येतो. मात्र या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. वयोमर्यादा साडेसतरा ते वीस वर्षे. या विद्यार्थ्यांची दृष्टी सामान्य असावी. रातांधळेपणा नसावा. जलमार्गाद्वारे झपाटय़ाने वाढलेला व्यापार हा या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध संधी उपलब्ध करून देत आहे. या अनुषंगाने सर्टिफिकेट कोर्स इन मेरिटाइम केटरिंग हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. विद्यार्थ्यांची निवड चाचणी परीक्षेद्वारे केली जाते. ही परीक्षा टी.एस. रहमान कॅम्पस, न्हावा, मुंबई येथे
घेतली जाते.
संपर्क- द कॅप्टन सुपरिंटेंडंट, टी. एस. रहमान जहाज, महल अॅनेक्स, १७० के समंदर पॉइन्ट इस्टेट, वरळी, मुंबई- ४०००१८. दूरध्वनी (०२२) २४९३३३२४. वेबसाइट- ६६६.३२ं१ंँेंल्ल.१ॠ
सागराच्या तळाशी काय दडले आहे?
सागराच्या तळाशी काय असावे याची उत्सुकता मानवाला अनादि अनंत काळापासून राहिली आहे. सागराचा तळ शोधणे हे उत्तम करिअरच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरू शकते. या अनुषंगाने ‘अण्णामलाई युनिव्हर्सिटी’च्या सागर विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाशी निगडित मास्टर ऑफ सायन्स इन ओशन सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचा विचार करायला हरकत नाही. अभ्यासक्रमाचा कालावधी- पाच वर्षे. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी १२ वीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह ६० टक्के गुण प्रश्नप्त करणे आवश्यक आहे. तसेच ३०x२४ सें.मी. आकाराचा, ३० रुपयांची पोस्टल तिकिटे लावलेला व स्वत:चा पत्ता लिहिलेला लिफाफा सोबत पाठवावा. अर्ज व माहितीपत्रकासाठी ४०० रु. चा डीडी ‘द रजिस्ट्रार, अण्णामलाई युनिव्हर्सिटी, अण्णामलाईनगर- ६०८००२ चेन्नई, तामिळनाडू या नावाने पाठवावा.
पत्ता- अण्णामलाई युनिव्हर्सिटी, अण्णामलाई- ६०८००२ तामिळनाडू. दूरध्वनी- ०४१४४- २३८६१०. वेबसाइट- www.annamalaiuniversity.ac.in्ल
पुष्कर मुंडले

No comments:

Post a Comment