Wednesday, September 9, 2009


करिअरच्या वेगळ्या वाटा कोणत्या?
यंदा १२ वीचा निकाल लागला आहे. १२ वीत चांगले मार्क मिळालेल्यांची संख्या बरीच आहे. आता प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आपण कोणती वाट पुढे निवडायची हा! अनेक मळलेल्या वाटा आहेत. या वाटांच्या व्यतिरिक्तही असंख्य वाटा आहेत.
एकूण ६२० करिअर आहेत आणि त्यापैकी ५५० करिअरकडे आपण वळत नाही हाच प्रश्न आहे तोच मुख्य आहे. खरे तर २५ लाख मुले-मुली महाराष्ट्रात १२ वीला, १० वीला बसतात. त्यापैकी ७५ हजार मुला-मुलींना अभियांत्रिकी-वैद्यकीय शिक्षण व allied कोर्सेसना प्रवेश मिळतो. तसेच पुढील दोन वर्षातली संख्या विचारात घेतली तर या ७५ लाखांपैकी दोन लाख १० हजार मुलांना प्रवेश मिळेल. पण आर्टस् कॉमर्सला जाणाऱ्यांची संख्याही खूप आहे.
तसेच १० वी, १२ वी नंतर कोणतेही शिक्षण न घेणाऱ्यांची संख्याही खूप आहे. ११३ कोटी लोक या देशात राहतात व दरवर्षी

भारतात एक कोटी ५० लाख मुले जन्मतात. Birth Rate २५ तर Death Rate १० आहे. सरकार लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी काहीही करत नाही.
नोकरीच्या संधी कमी होत आहेत. याला पालकही जबाबदार आहेत. कारण ६२० करिअर बँका ५५० करिअरमध्ये आपण मुलांना पाठवतच नाही. मला एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, ‘मला काय आवडतं?’ याचा विचार न करता आता जिथे नोकऱ्या आहेत तिथेच मुलांनी/मुलींनी आता गेले पाहिजे. या देशात भ्रष्टाचार आहे. सरकारी उदासिनता आहे. वीज-रस्ते नाहीत. बेरोजगारी वाढत आहेत. मंत्री/आमदार/खासदार यांना तुमचे आमचे काही पडलेले नाही.
अशा वेळेस १० वीला मुलगा येण्याआधीच आपण सर्व ६२० करिअरची यादी आणली पाहिजे. कौन्सिलिंग केलं पाहिजे. मुलांना/मुलींना कोणत्या बाजूला जायचं आहे, ते माहीत करून घेतलं पाहिजे. २१ व्या वर्षी GRE TOFEL ही परीक्षा देऊन ३० लाख रुपये शिष्यवृत्ती मिळवलीच पाहिजे.
दरवर्षी एक लाख मुले/मुली (सर्व देशातील) ही शिष्यवृत्ती मिळवतात. पण मराठी मुले/मुली अर्जही करत नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ही scholarship अति उत्कृष्ट आहे. पण मराठी पालक त्याची माहितीही करून घेत नाहीत हे दुर्दैव!
आपण पुढील ४० वर्षात ज्या करिअरमध्ये भव्य यश मिळेल त्याची माहिती घेऊ या! त्या ३० आहेत.
(१) खेकडय़ांची शेती (केरळ)
(२) बायो इन्फरमेटिक्स (MSC BIO-information (पुणे विद्यापीठ)
(३) इलेक्ट्रॉनिक्स + टेलिकम्युनिकेशन
(४) इलेक्ट्रॉनिक्स
(५) प्लंबिंग
(६) MSC (रंग) दोन वर्षे (बीएस्सीनंतर)
(७) MSC (Jute जाधवपूर विद्यापीठ कोलकाता).
(८) MSC पर्यावरण (भोपाळ/डेहराडून) इरउ नंतर दोन वर्षे (BSC with Micro-Bio ही चालेल).
(९) गांडूळ शेती
(१०) ब्रेड आणि बिस्कीट तयार करणे
(११) गच्चीवरील शेती
(१२) बंगल्यातील शेती
(१३) मेंदी लावणे (advance अभ्यासक्रम) मेंहदी रंग लायो पण मेहंदी पैसा लायो हेच (बरे) (एक मेंदी लावणारा मुलगा/मुलगी बोरिवलीत दरमहा ४० हजार रुपये मिळवतात.)
(१४) BSC with IT or BE with IT
(१५) Tally + शेअर मार्केट + Taxtation (ठाणे- बोरिवली- पार्ले- दादर- डोंबिवली- पुणे- नाशिक) १० महिन्यांचा अभ्यास.
(१६) शेअर बाजार सहा महिने सर्टिफिकेट कोर्स दलाल स्ट्रीट व्ही. टी.
(१७) पेटंट लॉ सहा महिने LLB नंतर
(१८) Mechanical Engg.
(१९) Dental mechanics (VT) दोन वर्षे कोर्सला CET ची गरज नाही.
(२०) Bio-physics/ Bio- chemistry (माटुंगा)
(२१) MBA cogistics (दिल्ली-मुंबई मद्रास कोलकाता).
(२२) MBA system मुंबई-पुणे
(२३) MBA (Mkt) सर्व विद्यापीठात
(२४) BSC स्पोर्टस् or BA (sports)
(२५) NDA petente
(२६) MD गायनिक MD (cardiac)
(२७) BA with Temple
(२८) BA with Religion
(२९) BA with psychology
(३०) BA with History
किरण जोग

No comments:

Post a Comment