हॉस्पिटॅलिटी उद्योगातील संधी आदरातिथ्य या क्षेत्रातही काही करिअर असू शकते? हो या क्षेत्रात खूप मोठे करिअर आहे म्हणून तर ताज, ओबेराय, विठ्ठल कामत यांचे आर्किड मोठमोठे हॉटेल उभे आहेत. हॉटेल या क्षेत्रात हॉस्पिटॅलिटीला खूप मान आहे. या क्षेत्रात प्रचंड संधी आहे. आज वाढत्या पर्यटन व्यवसायामुळे हॉटेल व्यवसायाला खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. पर्यटन उद्योग जगातील सर्वच देशात परकीय चलन मिळवून देणारी प्रथम क्रमांकाची इंडस्ट्री आहे, अशी गणना पर्यटन उद्योगाची होते. पर्यटन उद्योगाची दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यटन उद्योग हा देशातील बेकारी हटविण्यास व देश समृद्ध करण्यास मोलाचा वाटा पर्यटन उद्योगाचा आहे. कारण पर्यटक आपला देश बघायला येतात. त्यांची उत्तम निवासाची व्यवस्था, त्यांची खानपान सेवा हेच पर्यटन उद्योगाचे महत्त्वाचे घटक आहेत. म्हणूनच पर्यटन उद्योगाबरोबर हॉटेल उद्योगही तेजीत येणे त्या अनुषंगाने आले. आज हॉटेल उद्योगाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. म्हणून आता हॉस्पिटॅलिटी उद्योग हा शब्द रूढ होत आहे. आताच्या काळात हॉटेल या व्यवसायाचे तर रूपच पालटलेले दिसून येते. कारण भारताने मुक्त अर्थव्यवस्थेमुळे बऱ्याच कंपन्या भारतात व्यापार करण्यासाठी आल्या. त्यामुळे मोठमोठय़ा उद्योगाने चांगलीच पकड घेतली व समाजाचे प्रवाह ते पण बदलत आहे. आता घराच्या समोर मंडप टाकून लग्न, समारंभ, बारसे, काही सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत. त्यात काही पु. ल. देशपांडे यांनी जी नारायणाची भूमिका चित्रीत केली होती ती आता दिसत नाही. सर्वच लोक कॅटर्सवर सर्व जबाबदारी टाकून निश्चित होतात, म्हणून आता हॉटेल्सच्या हॉलची विविध रूपे अस्तित्वात आली. हॉटेल्सच्या विविध शाखा उपलब्ध झाल्या. रेस्टॉरंटस्, हॉटेल्स एअरपोर्ट, हॉस्पिटल्स, यात्रा- निवास, पॅलेस हॉटेल्स, हॉलीडे कॅम्पस, क्लब्ज, सबरबन हॉटेल्स, हॉस्पिटल्स, ब्युटिक हाऊस, डिलक्स ते वन स्टार हॉटेल्स, हायवे हॉटेल्स, बीचेस, हिल्स इ. कितीतरी प्रकारचे खाद्य व पेय आणि निवास यांनी ही हॉटेल्स विस्तारत गेली आहेत. आता या हॉटेल्सला मनुष्यबळही खूप प्रमाणात लागते. ज्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये प्रचंड प्रमाणात मनुष्यबळाची गरज असते. तसेच इथेही मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ लागत. आज सुखसोयी, चैन, गरज याचं्या संकल्पना काळाबरोबर बदलत गेल्या आहेत. आचारी, महाराज, स्वयंपाकीण काकूची जागा आता प्रतिष्ठित शेफने घेतली आहे. पाककलेत निपुण असलेल्या लोकांना आज खूप महत्त्व प्रश्नप्त झाले आहे. त्यामुळे हॉटेल विभागात अगदी फ्रन्ट ऑफिसपासून ते इंजिनीअरिंग विभागापर्यंत सर्व विभागात उत्कृष्ट लोकांची गरज आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा सर्व विचार करून या करिअरमध्ये यायचे आहे. आदरातिथ्य या करिअरमध्ये येण्यासाठी आपण हॉटेल विभागात कोणत्या विभागात जायचे ते ठरवा? आपले शिक्षण कोणते आहे? व आपण वेळ पडली तर कोणतेही काम करू शकतो का? हे सर्व स्वत:ला विचारा! या क्षेत्रात पाऊल टाकताना दोन ते तीन वर्षाची पदवी किंवा पदविका कॅटरिंग टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल, पण त्याचबरोबर निव्वळ डिग्री किंवा डिप्लोमा म्हणून या क्षेत्रात येण्यासाठी आणखी काही गुण लागतात. अपार कष्ट, मेहनत, खूप आत्मविश्वास, बोलण्याची कला, सौजन्य, संयम, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, संघभावना, शिस्त, सहनशीलता ज्याच्या अंगी हे गुण आहेत, त्यांनीच हे क्षेत्र निवडावे. हॉटेल व्यवसायातील काम चोवीस तास चालते. उमेदवारांना शिफ्टमध्ये काम करावे लागते. आवड व क्षमता असेल त्याच वेळेस या क्षेत्रात तुम्ही तुमचं स्वत:च वेगळं नाव निर्माण करू शकाल. जय विठ्ठल कामत यांचे आहे तसे. या क्षेत्रात जायचे कसे- हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी किंवा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या क्षेत्रांत जायचे असेल तर बारावी सायन्स नंतर चार वर्षाची डिग्री असते. ती करून या क्षेत्रात येऊ शकता किंवा कुठच्याही प्रकारची डिग्री असेल तरीही हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा किंवा डिग्री करून तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता. या क्षेत्रात एम. बी. ए., बी. कॉम., फायनान्स विभागात खूप महत्त्वाचे असतात. इतरही चतुर्थ श्रेणीतील खूप कामगारांची आवश्यकता असते. यामुळे हे क्षेत्र निवडायला हरकत नाही. या क्षेत्रातील अभ्यासक्रमात अतिशय कष्टाची गरज असते. कुकिंगच्याही पलीकडचं बरच शिकवलं जाते आणि पुस्तकी नोटस्पेक्षा प्रॅक्टिकलवरच भर जास्त असतो, म्हणून मुलांना खूप कष्ट करावे लागतात. या अभ्यासक्रमात १) अन्न उत्पादन करणे (फूड प्रश्नॅडक्शन) २) अन्न व पेय सेवा (फूड अॅण्ड बिव्हेरेज सव्र्हिस) ३) स्वागत कक्ष, व्यवस्थापन (फ्रन्ट ऑफिस मॅनेजमेंट) ४) हाऊसकीपिंग असे चार विभाग पडतात. तसेच मुलांना न्यूट्रिशनविषयक हायजीनबाबतीत महिती दिली जाते. हॉस्पिटॅलिटीविषयक कायदे काय असतात याची माहिती दिली जाते आणि सेल्स मार्केटिंग, अकाऊन्टन्सी, कम्युनिकेशन स्किल्स, फ्रेंच किंवा आणखी दुसरी एखादी भाषा शिकवली जाते. सिक्युरिटी व लॉस प्रिव्हेंशन, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट व कॉम्प्युटरची इ. हॉटेल व्यवस्थापनासाठी आवश्यक असते. सर्व गोष्टींचे सखोल ज्ञान या सर्व विषयांतून दिले जाते. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास संवर्धन, संभाषण चातुर्य व इंग्रजी भाषा डेव्हलप करणे या गोष्टींवर जास्त लक्ष दिले जाते. त्यामुळे मुलांना किंवा मुलींना चहूबाजूंनी सर्वच काही शिकवले जाते. त्यामुळे या क्षेत्राला संपूर्ण भारतात खूप मान आहे. एक उत्कृष्ट करिअर म्हणून या क्षेत्राकडे बघायला काहीच हरकत नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आजकाल त्या त्या इन्स्टिटय़ूटची रिक्रूटमेंट डायरेक्ट होते नाही तर एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये अॅड येतात. त्यांचा विचार करून पावले टाकू शकता. सव्र्हिस कुठे कुठे उपलब्ध असतात- १) तारांकित हॉटेल २) विमान सेवा/ जहाज सेवा ३) रुग्णालयाचे खान-पान विभाग ४) बहुराष्ट्रीय कंपन्या ५) शिक्षण क्षेत्र ६) पर्यटन क्षेत्र ७) इव्हेंट शो ८) व्यवस्थापन कंपन्या, र्मचट नेव्ही इत्यादी ठिकाणी करिअरची संधी उपलब्ध आहे. शिवाय कोणाला जर वाटले की आपण स्वत:चे हॉटेल काढावे तर जरूर तसा ते विचार करू शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअर- क्रुज हॉटेल्स आणि हॉटेल्समधील मद्य सेवागृह हे ग्राहकांना आकर्षित करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा व्यवसाय उघडतो तेव्हा या क्षेत्रामध्ये प्रत्येक महिन्यात एक ते दीड लाख रुपये मिळू शकतात. मद्य सेवा रेस्टॉरंटचे (गृहाचे) आणि हॉटेल्सचे मॅनेजरसुद्धा इव्हेंट मॅनेजमेंट किंवा एखाद्या ठराविक जगातील कार्पोरेट इव्हेंटच्या नावाखाली जगात एकत्र येऊ शकतात. संपूर्ण जगातील हॉस्पिटॅलिटी (आदरातिथ्य) करणारी क्षेत्रे आता निरनिराळ्या देशांमध्ये उच्च प्रतीचे टॅलेंट दाखवीत आहेत. हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेऊन तुम्ही फ्रेशर असूनसुद्धा तारांकित हॉटेलमध्ये किंवा परदेशातील रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळवू शकता. हॉस्पिटॅलिटीचा संबंध सृजनशीलतेशी असतो. म्हणून या क्षेत्रातील जॉब सॅटिसफॅक्शनही असते. जर स्वत:चा व्यवसाय असेल तर किती उत्पन्न व्हावे याला कोणतीही मर्यादा राहत नाही. हे एक मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्रात भरपूर अनुभव असूनसुद्धा आपल्याला नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळते. या क्षेत्रामध्ये परदेशात वास्तव्य करून तेथे नोकरी करण्याची पुष्कळ संधी असते आणि अनुभव घेण्यासाठी विविध देशात जावे लागते. १) या क्षेत्रात स्पर्धा भरपूर असते. प्रत्येक आठवडय़ात खूप ठिकाणी रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सुरू होतात. २) या क्षेत्रात जास्तीत जास्त तास काम करावे लागते, जे तुमचे सामाजिक आयुष्य बिघडवू शकते. ३) टीम वर्क आणि या कामाची आवड असल्याशिवाय या क्षेत्रामध्ये आपण टिकू शकत नाही. ४) या क्षेत्राविषयी काही गैरसमज असल्यास ते झटकून टाका. या क्षेत्रात येण्यासाठी- या क्षेत्रात येण्यासाठी काही इन्स्टिटय़ूट मात्र १२ वीनंतर प्रवेश देतात, पण हॉटेल मॅनेजमेंटची जर पदवी हवी असेल तर Joint Entrance Test ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सी.ई.टी. (Common Entrance TestX) ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा २०० मार्काची असते. तीन तासांचा कालावधी असतो. या दोन्ही पेपर्स मिळून परीक्षेसाठी पाच घटक अभ्यासक्रमासाठी असतात. बुद्धिमापन चाचणी, अतिथ्यशील सेवा, विज्ञान व गणितीय क्षमता, जनरल नॉलेज आणि इंग्रजी इ. पाच घटकांवर प्रवेश परीक्षा अवलंबून असते. ही परीक्षा दिल्यानंतरच तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो व तुम्ही डिग्री प्रश्नप्त करू शकता. या क्षेत्रात येण्यासाठी आर्ट, सायन्स किंवा कॉमर्स करून येऊ शकता. म्हणजे बघितले तर कलेतही खूप मोठे करिअर आहे. या क्षेत्रात येण्यासाठी पुढील संस्था महत्त्वाच्या आहेत- १) इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग अॅण्ड अप्लाइड न्यूट्रिशन, दादर, मुंबई. २) इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड कॅटरिंग, शेषाद्री रोड, बंगलोर. ३) इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, पुसा, नवी दिल्ली. पुना सिंहगड इन्स्टिटय़ूट, शिवाजी नगर, औरंगाबाद, बारडोस, गोवा, बंगलोर, अहमदनगर, विलेपार्ले, मुंबई, कोहिनूर दादर वेस्ट इ. ठिकाणी हॉस्पिटॅलिटीची पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम शिकवले जातात. मुलांनो लक्षात आले असेल की हॉटेल मॅनेजमेंट आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) या क्षेत्रात येण्यासाठी किती मेहनतीची गरज आहे. त्याच वेळेस तुम्ही या क्षेत्रात स्वत:चे एक वेगळे स्थान प्रश्नप्त करू शकाल. तेव्हा हेही क्षेत्र एक उत्कृष्ट क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. तेव्हा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी All the best. वरदा मुळे-जोशी ९४२१४७३१३१ |
No comments:
Post a Comment