पाईपिंग इंजिनीअरिंगमधील करिअर
मी बी.ई. (केमिकल) पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. कृपया मला पाईपिंग इंजिनीअरिंगमधील करिअर व अभ्यासक्रम तसेच संस्थांची माहिती द्यावी? - योगेश मोसमकर गॅस व पाणी या दोन्ही गोष्टी आपल्याला घरपोच मिळतात त्या पाईपमधून. या छोटय़ा पाईपची आणि आपली ओळख असते; परंतु पाईपची दुनिया यापेक्षा मोठी आहे. घरगुती वापराच्या छोटय़ा पाईपापासून ते जमिनीवरच्या, जमिनीखालच्या, डोंगराच्या पोटातल्या, समुद्राच्या तळातल्या अवाढव्य पाईपपर्यंत ही दुनिया विस्तारलेली आहे. या सगळ्या दुनियेचा व्याप सांभाळण्याचं काम पाईप इंजिनीअरचं असतं. पाईप डिझाईन व इंजिनीअरिंग हा इंजिनीअरिंगमधील अनेक क्षेत्रामध्ये महत्त्वाचा घटक असतो. केमिकल प्रश्नेसेसिंग इंडस्ट्री, पेट्रोलियम व पेट्रोकेमिकल इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, पॉवर प्लँट, एल.एन.जी./ एल.पी.जी./ सी.एन.जी. वाहून नेणाऱ्या लांब पल्ल्यांच्या पाइप लाईन्स, इंटिग्रेशन प्रश्नेजेक्ट्स अशा उद्योगांमध्ये भांडवली खर्चाच्या २५ ते ४० टक्के रक्कम पाईपिंगवर खर्च होते. प्रश्नेसेस व संबंधित सर्व उद्योगांमध्ये योजना आखण्यापासून ते अंमलबजावणी करण्यापर्यंत पाईपिंग व्यावसायिक महत्त्वाची
भूमिका बजावतात. म्हणूनच पाईपिंग इंजिनीअरिंग हे एक महत्त्वाचं क्षेत्र बनलेलं आहे. पेट्रोलियम उत्पादन, नॅचरल गॅस, ज्वलनशील व घातक रसायनं यांची वाहतूक पाईपद्वारे करण्याकडे कल वाढत असल्याने जमिनीखालील व लांब पल्ल्यांच्या पाईप लाईन्समधील तज्ज्ञांची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. गंज प्रतिरोधक प्रक्रिया, पाइप लाईन्सची देखभाल, लांब पल्ल्याच्या पाईप लाईन्समधील गळती शोधणं, पाईप कोटिंग, काँक्रीट कोटिंग, बेडिंग, वेल्डिंग, पाण्याखालून जाणाऱ्या पाईप लाईन्सची देखभाल, पाईप लाईन सफाई या प्रकारच्या कामांचा पाईप इंजिनीअरिंगमध्ये समावेश होतो. या बरोबरीने पाईपिंग इंजिनीअरिंगवर डिझाईन, उत्पादन, प्रश्नेजेक्ट प्लॅनिंग, पाईप लाईन इंटिग्रिटी, गंज प्रतिरोधक उपाययोजना, फॅसिलिटी ऑडिट, ऑटोमेशन व कंट्रोल सिस्टिम. पेट्रोलियम पदार्थ वाहून नेणाऱ्या लांब पल्ल्याच्या व जमिनीखालून जाणाऱ्या पाईप लाईनची सुरक्षितता अशा जबाबदाऱ्या पाईप इंजिनीअरवर असतात. पाईपिंग इंजिनीअरिंगमध्ये विविध विषयांतील तज्ज्ञांची आवश्यकता असते. प्रश्नमुख्याने इंजिनीअरिंग शिक्षणाची पाश्र्वभूमी असणाऱ्यांना या क्षेत्रात भरपूर करिअर संधी आहेत. केमिकल व मेकॅनिकल इंजिनीअर्सना यामध्ये भरपूर वाव आहे. कोणत्या द्रवपदार्थ वा वायू (गॅस) साठी प्रश्नेजेक्ट उभा करायचा आहे, त्यानुसार प्लँट उभा करावा लागतो. त्या पदार्थाचे रासायनिक गुणधर्म तपासण्यासाठी केमिकल इंजिनीअर्सची आवश्यकता असते. पाईपिंगचं मटेरियल निवडणं, त्याची स्ट्रेंग्थ तपासणं, हीटिंग, एअरकंडिशनिंग यांसारख्या अनेक गोष्टींसाठी मेकॅनिकल इंजिनीअर्सची गरज असते. याचबरोबरीने प्लँट उभारण्यासाठी विशेष अभ्यास केलेल्या सिव्हिल इंजिनीअर्सची, तर विद्युत पुरवठय़ाची रचना करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सची आवश्यकता असते. यामुळेच पाईपिंग इंजिनीअरिंग हे आंतरशाखीय क्षेत्र आहे. अनेक स्किल असणाऱ्या माणसांची इथे मोठय़ा प्रमाणावर आवश्यकता असते. अभ्यासक्रम व संस्था आय.आय.टी. (मुंबई) : पाईपिंग इंजिनीअरिंग सेल (आय.आय.टी., मुंबई) व दूरशिक्षण विभागातर्फे पाईपिंग इंजिनीअरिंगचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमासाठी केमिकल व मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवीधरांना प्रश्नधान्य दिलं जातं. काही जागांवर इन्स्ट्रमेन्टेशन, प्रश्नॅडक्शन, रिफायनरी इंजिनीअरिंग पदवीधर काही निकष लावून निवडले जातात. डिप्लोमाधारकांना सहसा प्रवेश दिला जात नाही. संबंधित क्षेत्रातील सात वर्षाचा अनुभवधारक डिप्लोमा उमेदवारांना प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमामध्ये खालील विषयांचा अंतर्भाव केलेला असतो. १) स्कोप ऑफ पाईपिंग इंजिनीअरिंग २) पाईपिंग एलिमेंट्स अॅण्ड स्पेशालिटीज् ३) मेकॅनिकल डिझाइन फंडामेन्टल्स ४) पाईप हायड्रॉलिक्स अॅण्ड सायझिंग ५) पाईपिंग ड्रॉइंग बेसिक्स ६) डेव्हलपमेंट ऑफ प्लॉट प्लँट्स ७) इक्विपमेंट लेआऊट ८) प्रश्नेसेस पाईपिंग लेआऊट ९) युटिलिटी पाईपिंग लेआऊट १०) फ्लेक्झिबिलिटी अॅनॅलिसिस ११) सिलेक्शन ऑफ सपोर्ट्स अॅण्ड एक्सपान्शन जॉइंट्स या विषयाबरोबरीनेच स्टील इंजिनीअरिंग, ट्रक्झियंट फ्युइड फ्लो अॅनॅलिसिस, क्रायोजेनिक स्टोरेज, डायनॅमिक अॅनॅलिसिस, प्रश्नेसेस इन्शुलेशन, इन्स्ट्रमेन्टेशन अॅण्ड कंट्रोल या विषयांचीदेखील ओळख करून दिली जाते. प्रॅक्टिकल्स, कॅड (कॉम्प्युटर एडेड डिझाईन)चाही वापर अभ्यासक्रमात केलेला आहे. या वर्षीचा अभ्यासक्रम ५ ते १८ डिसेंबर २००९ रोजी सुरू होणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज पाठवण्यासाठी अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २००९ ही आहे. संपर्क : प्रश्न. मोहरीर, पाईपिंग इंजिनीअरिंग सेल, कॅड सेंटर, केमिकल इंजिनीअरिंग विभाग, आय.आय.टी. मुंबई, पवई, मुंबई-४०००७६. फोन : ०२२-२५७२००३६, ई-मेल :pipingcel@iitb.ac.in महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये पाईपिंग इंजिनीअरिंगशी संबंधित खालील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पाईपिंग डिझाईन अॅण्ड इंजिनीअरिंग. सर्टिफिकेट कोर्स इन पाईपिंग डिझाईन अॅण्ड इंजिनीअरिंग. सर्टिफिकेट कोर्स इन प्रश्नेसेस सिम्युलेशन. (हीट एक्स्चेंजर डिझाईन) सर्टिफिकेट कोर्स इन स्ट्रेस, अॅनॅलिसिस. संपर्क : डिपार्टमेंट ऑफ पाईपिंग डिझाईन अॅण्ड इंजिनीअरिंग, सव्र्हे नं. १२४, एम.आय.टी. कॅम्पस, कोथरूड, पौड रोड, पुणे-४११०३८. दूरध्वनी : ०२०-३०२७३४३८ सुविद्या इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये पाईपिंग इंजिनीअरिंग क्षेत्रातील अनेक अभ्यासक्रम शिकविले जातात. प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये प्रॅक्टिकल या अभ्यासक्रमांतर्गत घेतली जातात. अभ्यासक्रमाचे नाव पात्रता * पाईपिंग इंजिनीअरिंग मेकॅनिकल, केमिकल व प्रश्नॅडक्शन इंजिनीअरिंगमधील पदवी/पदविका * प्रश्नेसेस इंजिनीअरिंग केमिकल इंजिनीअरिंग पदवी/पदविका * मेकॅनिकल डिझाईन ऑफ प्रश्नेसेस इक्विपमेंट मेकॅनिकल, केमिकल व प्रश्नॅडक्शन इंजिनीअरिंगमधील पदवी/पदविका * इन्स्ट्रमेन्टेशन अॅण्ड कंट्रोल इन्स्ट्रमेन्टेशन व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदवी/पदविका * स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग सिव्हिल, प्रश्नॅडक्शन इंजिनीअरिंग पदवी/पदविका * H.V.A.C हीटिंग, व्हेंटिलेशन व एअरकंडिशनिंग मेकॅनिकल, प्रश्नॅडक्शन इंजिनीअरिंग पदवी/पदविका * इंजिनीअरिंग डिझाईन व ड्राफ्टिंग १२ वी विज्ञान/कला/वाणिज्य * पाईपिंग डिझाईन व ड्राफ्टिंग आय.टी.आय. ड्राफ्टस्मन * इलेक्ट्रिकल सिस्टिम डिझाईन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी/पदविका * अॅडव्हान्स पाईप स्ट्रेस अॅनॅलिसिस मेकॅनिकल व केमिकल पदवी/पदविका संपर्क :- सुविद्या इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, १८/१४०, आनंदनगर, नेहरू रोड, वाकोला, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई-४०००५५. दूरध्वनी : ०२२-२६६८२२९० ई-मेल : www.suvidya.ac.in रोजगार संधी १) केमिकल प्रश्नेसेसिंग इंडस्ट्री २) पेट्रोलियम व पेट्रोकेमिकल इंडस्ट्री ३) फार्मास्युटिकल इंडस्ट्री ४) पॉवर प्लँट ५) एल.एन.जी/ एन.पी.जी./ सी.एन.जी. पाईपिंग सिस्टिम पाईपिंग इंजिनीअरिंगमध्ये भारतीय तंत्रज्ञांना जगभरातून भरपूर मागणी आहे. पाश्चिमात्य तसंच अरब देशांमधून पाईपिंग डिझाइनिंगपासून ते प्रत्यक्ष प्लँट उभा करण्यासाठीची कामं भारतात आऊटसोर्स व्हायला लागली आहेत. आवश्यकता जास्त व प्रशिक्षित मनुष्यशक्ती कमी अशी परिस्थिती या क्षेत्राची आहे. आजच्या रिसेशनच्या काळात रोजगाराच्या चांगल्या संधी देणाऱ्या या क्षेत्राकडे तरुणांनी वळायला हरकत नाही. आनंद मापुस्कर फोन : ०२२-३२५०८४८७. |
No comments:
Post a Comment