Friday, October 23, 2009

दुग्धालय विकास तंत्रज्ञान
गुरूवार, २२ ऑक्टोबर २००९
पुष्कर मुंडले - ९९६९४६३६१०
दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या कार्यात उत्कृष्ट आणि अधिक प्राविण्याने उत्पादन करण्यासाठी तसेच त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांचे दुग्धालय विकासात मह्त्त्वाचे स्थान असते. विशेषत: दुग्धालय तंत्रज्ञांना नव्या आणि सुधारित उत्पादन टिकाऊपणा आणि दूध, चीज आणि अन्य दुग्धजन्य पदार्थाच्या वापरासाठी सूक्ष्मजंतूशास्त्र, दुग्धालय रसायन, दुग्धालय अभियांत्रिकी आणि दुग्धालयाचे अर्थशास्त्र यांच्या उच्चतत्त्वावर भर द्यावा लागतो. दुग्धतंत्रज्ञ दुग्धउत्पादन वाढविण्यासाठी अधिक दूध देऊ शकणाऱ्या गाईंची निवड आणि त्यांच्या योग्य पोषणासाठी आवश्यक ती आरोग्यसेवा, गाईची वाढ, गाईचा पान्हा आणि एकूणच गुरांचे शरीरशास्त्र यांचा अभ्यास करतात. उत्पादित केलेल्या दुधाची संख्या, दर्जा आणि आहारातील मूल्य यासाठी हे तंत्रज्ञ विविध प्रकारच्या गाईगुरांच्या जाती आणि वातावरण यांचा तुलनात्मक अभ्यास करून मांडतात. गाई-म्हशींच्या प्रजोत्पादनावर, त्यांना द्यायच्या आहारावर तसेच दुग्धालय विकासाच्या व्यवस्थापनावर त्यांचे संशोधन चालते.
कोणे एके काळी दुधाला पृथ्वीतलावरलं अमृत समजलं जायचं इतकं ते दुष्प्राप्य असायचं. सरकारी दुधाचं कार्ड मिळवणं हासुद्धा एक शौर्याचाच भाग असायचा. पण त्यानंतर भारतीय शेतकी व्यवसायात एक विलक्षण मन्वंतर घडून आलं. शेतकऱ्यांना उपलब्ध साधनसामग्रीतून अत्याधुनिक पद्धतीनं अधिक उत्पादन कसं मिळवायचं याचं ज्ञान प्राप्त झालं. नवनवीन संशोधन झालं आणि ते दूरदर्शनद्वारे तात्काळ खेडय़ापाडय़ात पोहोचलं. जेनेटिक इंजिनीयरिंगसारखं शास्त्र विकसित झालं आणि त्यातूनच दुभत्या जनावरांची दूधक्षमता इतकी वाढत गेली की, त्यांना ‘दूध उत्पादन करणारी यंत्र’ असं संबोधलं जाऊ लागलं. अशी रीतीने प्रत्यही वाढत जाणारं उत्पादन योग्य रीतीने वितरित व्हावं, किमान त्याचा नाश होऊ नये म्हणून दूधउत्पादकांना ठिकठिकाणी शीतगृहे कार्यरत ठेवावी लागली आहेत. अजून यासाठी लागणारी वीज पुरेशी नसल्याचा अनुभव आहेच. यासाठी येत्या काही वर्षांत ‘सोलर एनर्जी’ विकसित होणार आहे अशी चिन्हे आहेत.
दुग्धतंत्रज्ञानात दुधाच्या निर्मितीपासून ते सेवनापर्यंत सर्व प्रक्रियांचा समावेश होतो. तसेच प्रोसेसिंग, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्ट आणि फिजिकल डिस्ट्रिब्युशन यांचा समावेश होतो. दुग्धतंत्रज्ञान हे जैवरसायनशास्त्र, जीवाणूशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी, पोषणशास्त्र यांवर आधारित असून त्यात अभियांत्रिकीची तत्त्वं वापरली जातात. दुधाची नासाडी रोखणे, गुणवत्ता सुधारणे, शेल्फ लाइफ वाढवणे आणि माणसांच्या सेवनासाठी ते चविष्ट व सुरक्षित बनवणे आणि चीज व इतर दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी ही तत्त्वं वापरली जातात. दुग्धशास्त्रज्ञ पुनरुत्पादनशास्त्राचा लॅक्टेशनचा अभ्यास करतात आणि दुग्धजन्य वाणांमध्ये सुधारणा करण्यासाठी कार्यक्रम आखतात. विविध प्रकारच्या अन्नावर व निर्माण केलेल्या दुधाच्या प्रमाणावर, गुणवत्तेवर व पोषण मूल्यावर होणाऱ्या वातावरणाचे परिणाम निश्चित करण्यासाठी प्रयोग करतात. ते वाणांवर, अन्नावर संशोधन करतात आणि दुग्धजन्य पशूंचे व्यवस्थापन करतात. एका मोठय़ा विस्कळीत उद्योगापासून आता विस्तृत संघटित उद्योगात दुग्धशास्त्र या गुंतागुंतीच्या क्षेत्राचं रूपांतर झालं आहे आणि म्हणूनच या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी मागणी आहे.
कामाचे स्वरूप/ वातावरण : हे कार्य आवश्यकतेनुसार शास्त्रीय पद्धतीचे आणि संशोधन क्षेत्रातील किंवा प्रात्यक्षिकांवर आधारलेले असते. दूधशेतीमध्ये दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थ यांच्यामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांमुळे यात स्वारस्य असलेल्यांसाठी खूपच काम असते. या क्षेत्रातील संशोधन आणि सुधारणा यांच्या कार्यपद्धतीत खूपच आव्हानात्मक काम आहे. दुग्धालय विकास तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्या तसेच अगणित तंत्रज्ञ आणि व्यवस्थापनातील धुरिणांच्या सामुदायिक संघाच्या कर्तृत्वामुळे एकात्मिक दुग्ध सुधारणाच्या जगतातील ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यामुळे मुळात आखलेल्या रूपरेषेनुसार ध्येयपूर्ती झाली आहे. या कार्यात शासकीय तसेच खासगी क्षेत्रातील असे संमिश्र स्वरूपातील संस्थांमध्ये काम करण्याची ऐच्छिक मुभा आहे. त्यामुळे कार्यपद्धतीत अटी आणि शर्ती जरी वेगवेगळ्या असल्या तरी कार्यपद्धती एकच असते.
कौशल्य-पसंती/ मनाचा कल : दुग्धालय विकास क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या इच्छुकांमध्ये नव्या कार्यपद्धतीचे आणि सुधारणांचे स्वागत करणारा, सहनशीलता बाळगण्याचा स्वभाव असलेल्या, चिकाटी अंगी बाळगणारा, समूहामध्ये कार्यात कौशल्य साधू शकणारा मूलतत्त्व असा मनाचा कल हवा. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना तर प्रदीर्घ काळ काम करीत असताना एकांडय़ा शिलेदाराप्रमाणे कार्याचा पाठपुरावा करण्याची सामथ्र्यशीलता हवी.
प्रशिक्षण : शास्त्र शाखेतील (फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स) प्लस टू पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दुग्ध तंत्रज्ञानाचा ४ वर्षांचा प्रशिक्षण कार्यक्रम खुला आहे. सर्वाधिक बाबतीत निवडप्रक्रियेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्समध्ये प्रवेश चाचणी द्यावी लागते. कृषी आणि संबंधित पशुवैद्यकीय शास्त्र तसेच नॅशनल प्लॅण्टेड स्कॉलरशिपच्या प्रदानासाठी पदवी न घेतलेल्यांसाठी दि इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च (कउअफ) या राष्ट्रीय स्तरावरील स्वायत्त शिखर संस्थेतर्फे प्रवेश देण्यात येतो. प्रांतीय कृषी विद्यापीठे, मध्यवर्ती कृषी विद्यापीठ इम्फाल (मणीपूर) येथील एकूण १५ टक्के जागा भरण्यासाठी, तसेच ठऊफक कर्नाल (हरियाणा) येथील १०० टक्के जागा भरण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.
दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांची प्रक्रिया, दर्जा नियंत्रण आणि दुग्धालय विकासाच्या प्रक्रियेची उपकरणे यातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी बी. टेक, डेअरी टेक अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध आहे. डेअरी मायक्रोबायोलॉजी/ केमिस्ट्री/ अ‍ॅनिमल बायोकेमिस्ट्री/ बायोटेक्नॉलॉजी/ डेअरी इकॉनॉमिक्स अशांसारख्या विषयांमध्ये स्पेशालिस्ट होण्यासाठी मास्टर्स डिग्री कोर्समध्ये तरतूद आहे. १२ वी विज्ञान शाखेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर दुग्धतंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी पात्र ठरतो. पदवीनंतर स्पेशलायझेशनकरिता पदव्युत्तर शिक्षण घेता येते. दुग्धतंत्रज्ञानाशिवाय प्युअर सायन्स, कृषी, पशुवैद्यकीय शास्त्र, प्राणिशास्त्र, अभियांत्रिकी, गृहशास्त्र यांतील ५५ टक्केसह पदवी असलेले पदव्युत्तर अभ्यासक्रम घेऊ शकतात.
भवितव्य/ स्थाननिश्चिती : मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर निसर्ग आपल्याला दोन्ही करांनी द्यायला सिद्ध झाला आहे. त्याला सामोरं जाणं सर्वस्वी नव्या पिढीच्या हाती आहे. शिवाय इंटरनेटमुळे जग आता आपल्या दिवाणखान्यात येऊन ठेपलं आहे. या सर्वाचा आनंदानं स्वीकार करून परिश्रमांची जोड दिली, तर आजूबाजूचा आसमंत सुजलाम् सुफलाम् व्हायला वेळ लागणार नाही.
दुग्धतंत्रज्ञानातील अभ्यासक्रम
चालवणाऱ्या संस्था:
अभ्यासक्रम : बी.एस्सी. दुग्धतंत्रज्ञान.
पात्रता : १० + २ भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित यांसह.
कालावधी : ४ वर्षे
संस्था : कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, कृषकनगर, लबंधी, रायपूर- ४९२०१२,
मध्य प्रदेश (१० + २ पीसीएम ५५ टक्केंसह)
फॅकल्टी ऑफ वेटर्नरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल सायन्स, पी.ओ. कृषी विश्वविद्यालय,
नादिया- ७४१२५२ पश्चिम बंगाल
(१० + २ विज्ञान शाखा)
संजय गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी
राजेंद्र अ‍ॅग्रिकल्चरल विद्यापीठ, पी. ओ. धेलवन, लोहियानगर, पाटना- ८०००२०
(१० + २ किंवा पीसीएम व इंग्रजीत समकक्ष,
४ वर्षे ६ महिने)

No comments:

Post a Comment