Thursday, November 5, 2009

औषध उद्योगातील मंदीतील संधीPrintE-mail
४ बुधवार, नोव्हेंबर २००९
सचिन जगदाळे-sachin.jagdale28@gmail.com
संपर्क- ९८६९२३२२६९

जवळपास संपत आलेली जागतिक मंदी प्रामुख्याने लक्षात राहील ती जगभरात लाखो कामगारांनी गमावलेल्या नोकऱ्यांसाठी. मात्र या परिस्थितीस अपवाद ठरला तो औषध उद्योग. उल्लेखनीय बाब म्हणजे बऱ्याच औषध कंपन्यांनी याच अवघड काळात अनेक नवीन कामगारांची भरतीही केली. औषध निर्मिती क्षेत्र रोजगाराच्या दृष्टीने कसे सुरक्षित आहे त्याचा हा लेखाजोखा.
मर्चण्ट नेव्हीत कसे जाल?PrintE-mail
४ बुधवार, नोव्हेंबर २००९
पुष्कर मुंडले -संपर्क- ९९६९४६३६१०

मर्चण्ट नेव्ही म्हणजे काय? भारतात नेव्हीचे एकूण दोन प्रकार आहेत. एक इंडियन नेव्ही. दुसरा प्रकार मर्चण्ट नेव्ही. यापैकी इंडियन नेव्ही भारतीय संरक्षण सेवेशी संबंधित आहे. तर मर्चन्ट नेव्ही हा प्रकार व्यापारी सागरी वाहतुकीशी संबंधित आहे. मर्चण्ट नेव्ही यालाच मराठीत व्यापारी नौदल असे म्हणतात.
विम्याबद्दलचं सब कुछ म्हणजे ‘विम्याचे वरदान’PrintE-mail
४ बुधवार, नोव्हेंबर २००९
ब्रिटिशांनी आपल्या देशात रुजवलेला ‘विमा’ हा आता जणू वटवृक्षाप्रमाणे विस्तारलेला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर तर खासगी विमा कंपन्या, विदेशी कंपन्यांच्या आगमनाने एक स्पर्धेचे निकोप वातावरण निर्माण झालेले आहे. या सगळ्यात ग्राहक म्हणजेच विमाधारकांच्या पुढे अनेकविध पर्याय उपलब्ध झालेले आहेत. या सगळ्या कारणांनी ‘विमा’ हा फक्त पॉलिसी उतरवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. विम्याची व्याप्ती वाढलेली आहे. विमाधारकच नव्हे तर विमा एजंट आणि तुम्ही आम्ही ‘विमा साक्षर’ होण्याची आवश्यकता आहे.
आशावादातून यशPrintE-mail
४ बुधवार, नोव्हेंबर २ ० ० ९
विलास मुणगेकर -संपर्क- ९८९२०७८७१३
व्यवस्थापन प्रशिक्षक

‘वेळच मिळत नाही’, ‘कधी काय होईल सांगता येत नाही’, ‘मनासारख्या गोष्टी घडत नाहीत’, ‘हल्ली कोणकोणाला विचारत नाही’, ‘पूर्वी सर्व मस्त होतं. पण आता’ही व यासारखी वाक्यं आपण अनेकांच्या मुखातून वेळोवेळी ऐकत असतो.
प्रकाशन व्यवसायPrintE-mail
४ बुधवार, नोव्हेंबर २ ० ० ९
पुष्कर मुंडले-संपर्क- ९९६९४६३६१०.

माहितीच्या प्रचार- प्रसारामुळे तसेच वाढत्या शिक्षणामुळे प्रकाशन व्यवसायाला कमालीचे महत्त्व आले आहे. जिद्द, चिकाटी, सृजनशीलता, कलात्मकता, दूरदृष्टी, साहित्यिक जाणिवा, मार्केटिंग अवगत असणाऱ्यांना या क्षेत्रात भरपूर संधी आहे. पैशाबरोबरच कलाकृती निर्मितीचा, सामाजिक सेवेचा मोठा आनंद या व्यवसायातून मिळविता येतो. शिवाय मान-सन्मान, प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळते.
ग्रंथालयात सूक्ष्मलेखन तंत्राचा उपयोगPrintE-mail
’ मुरलीधर एस. हेडावू , ४ बुधवार, नोव्हेंबर २ ० ० ९
सूक्ष्मलिपी हा प्रतिलिपीचाच एक भाग आहे. यात फरक एवढाच की मूळ प्रतीची प्रतिलिपी यात इतक्या लहान आकाराची बनलेली असते की, ती वाचण्यास एखाद्या उपकरणाची गरज असते. इतर प्रतिलिपीप्रमाणे सूक्ष्मलिपीच्याही अनेक प्रती काढता येतात.
संस्काराची छाप आणि व्यक्तिमत्त्व विकासPrintE-mail
४ बुधवार, नोव्हेंबर २ ० ० ९
रमाकांत जाधव- संपर्क : ९८७०४७९८१३

आपण जिथे जन्म घेतो, तिथल्या संस्काराची आपल्यावर छाप पडते. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे एका नावाडय़ाचे चिरंजीव. एका नावाडय़ाचा मुलगा देशाचा राष्ट्रपती होतो, शास्त्रज्ञ होतो. राष्ट्रपती भवनात त्यांनी ज्या दोन बॅगा आणल्या, त्याच बॅगा ते राष्ट्रपती भवन सोडताना घेऊन गेले. डॉ. कलाम यांचे वडील अशिक्षित होते, पण आपल्या मुलावर त्यांनी उत्तम संस्कार केले.

No comments:

Post a Comment