- जपानचे नेगिशी, सुझुकी व अमेरिकेचे रिचर्ड हेक यांना रसायनशास्त्राचे नोबेल
Thursday, October 7, 2010
रसायनशास्त्राचे नोबेल
Wednesday, October 6, 2010
Wednesday, August 25, 2010
Wednesday, August 4, 2010
Wednesday, June 16, 2010
Tuesday, June 15, 2010
| गुणवंतांची प्रतिक्रिया : बारावीचा अभ्यास हाच सीइटीचा पाया |
| प्रतिनिधी vruttant@expressindia.com अनिश बिवलकर (पीसीएम- १९९, रुईया महाविद्यालाय) सीइटीचा अभ्यास हा सर्वस्वी बारावीच्या अभ्यासावर अवलंबून असल्याने मी सप्टेंबपर्यंत बारावीचा अभ्यास पूर्ण केला आणि त्यानंतर सीइटीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. तसेच अकरावीत असतानाच जुलै माहिन्यापासून दररोज एक ते दोन तास इतका वेळ बारावीच्या अभ्यासासाठी दिला होता. त्याचबरोबर अकरावीतील बेसिक कन्सेप्टसुद्धा पक्क्या केल्या होत्या. याचा पुढे फायदा झाला. बारावी आणि सीइटीसाठी नियमित अभ्यास महत्त्वाचा आहे. सर्व विषयांना एकसमान वेळ देऊन समतोल अभ्यास केला तर यश मिळवणे सोपे आहे. मला यापुढे इंजिनीअरिंग करायचे असून व्हीजेटीआयला प्रवेश घेण्याची इच्छा आहे. राहूल दुबे (पीसीएम- १९९, मिठीबाई महाविद्यालय) सरतेशेवटी सीईटीचा संपूर्ण अभ्यासक्रम हा बारावीच्या अभ्यासक्रमावरच अवलंबून आहे. त्यामुळे जर आपले बारावीचे मूलभूत कन्सेप्टस् पक्के असतील, तर सीइटीचा अभ्यास करताना कठीण जात नाही. तसेच मी जास्तीत जास्त गणिते सोडविण्याचा भरपूर सराव केला होता. त्यामुळे पेपर सोडवताना वेळ वाचला आणि या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवता आले. आता यापुढे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचे असून व्हीजेटीआयमध्ये प्रवेश घेणार आहे. श्रोनित लधानी (पीसीएम- १९९, साठय़े महाविद्यालय) नियामित अभ्यास, एकाग्रता आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडविणे हेच माझ्या सीइटीमधील यशाचे गमक म्हणावे लागेल. रोज मी साधारण तीन तास एकाग्रचित्ताने अभ्यास केला. तसेच इतर वेळी मात्र तितक्याच मोकळेपणाने इतर गोष्टींचाही आनांद लुटला. फक्त अभ्यस एके अभ्यास कधीच केला नाही. त्यााचवेळी सीइटीचा अभ्यास करताना बारावीकडेही तितकेच लक्ष दिले. बारावी हाच सीइटीच्या परीक्षेचा पाया असल्याने या दोन्ही परीक्षांचा समतोल पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. आता यापुढे मी सरदार पटेल किंवा व्हीजेटीआयमध्यो प्रवेश घेऊन सिव्हील इंजिनिअरिंग करणार आहे. केयूर देसाई (पीसीबी-१९८, मिठीबाई महाविद्यालय) मी सुरूवातीपासूनच सीइटीच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. त्यातच माझा बारावीचा अभ्यास होऊन जायचा. फक्त बारावीच्या परीक्षेआधी १०-१५ दिवस मी बारावीचा विशेष लक्ष देऊन अभ्यास केला. त्यामुळे बारावीत सुद्धा नव्वद टक्के मिळाले. साीइटीचा अभ्यास करताना मी रसायनशास्त्रातील सूत्रे नीट लक्षात ठेवली होती. त्यात मला पूर्ण ५० गुण मिळाले. तसेच इतर विषयांचा अभ्यास करताना सुद्धा काही खास क्लुप्त्या लक्षात ठेवल्या होत्या. त्यामुळे भरभर पेपर सोडवताना याचा खूप उपयोग झाला. आता यापुढे मला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे असून त्यासाठी जेजे किंवा केईएममध्ये प्रवेश घेणार आहे. |
Wednesday, June 9, 2010
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
Subscribe to:
Posts (Atom)