शैलजा केळुसकर, बुधवार, ०९ डिसेंबर २००९
संपर्क- ९३२३८७७६२५
यशाची गॅरंटी नावाचं एक छोटंसं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. ‘रंग, रूप, वय, शिक्षण, आर्थिक स्थिती, कशाचीच अट नाही असं लांबलचक उपशीर्षक या पुस्तकाला आहे. हे उपशीर्षक सार्थ ठरवणारा मजकूर या पुस्तकात आहे. हे पुस्तक शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच नव्हे तर थोरामोठय़ांना उपयोगी ठरणारं आहे. किंबहुना मोठय़ांनाच ते अधिक उपयोगी ठरू शकेल. कारण एखादी गोष्ट समजूत घेऊन ती कृतीत वापरण्याचं गांभीर्य मोठय़ांकडेच अधिक असू शकतं. मोठय़ांचा जीवनाकडे बघण्याचा परिपक्वपणा या पुस्तकाचा अधिक लाभ घेऊ शकेल. प्रगती करण्यासाठी या पुस्तकात मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले गेले आहे. यशस्वी होण्यासंदर्भात अलिकडे एक पुस्तक मोठमोठय़ा जाहिरातींतून लोकांपर्यंत पोहोचलं आहे. |